रिलायन्स जिओचा फोन बाजारात येणार म्हटल्यावर सर्व टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले होते. पहिल्या टप्प्यात या फोनच्या नोंदणीला मोठा प्रतिसादही मिळाला. रिलायन्स जीओचा हा ‘स्वस्त आणि मस्त’ फोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाल्याने कंपनीला फोन बुकींग थांबवावेही लागले होते. पण जिओच्या या फोनला भारती एअरटेल कंपनी टक्कर देणार आहे. किमान किंमतीत ४ जी मोबाईल फोनची निर्मिती करण्याची तयारी कंपनीने सुरू केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एअरटेलच्या या फोनची किंमत २५०० ते २७०० रुपयांपर्यंत असेल, असे कंपनीने नुकतेच जाहीर केले आहे. हा फोन रिलायन्स जिओच्या फोनला टक्कर देईल, असा विश्वासही कंपनीला आहे. हा फोन दिवाळीपर्यंत बाजारात दाखल होण्याची शक्यता असून यामध्ये नवीन आकर्षक डेटा ऑफर्सही देण्यात येणार आहेत. ड्युएल सिमची सुविधा असलेल्या या फोनला ४ इंचाचा डिस्प्ले देण्यात येणार आहे. १ जीबी रॅम असलेल्या या फोनचे बुकींग नेमके कधी सुरु होईल, याबाबत अद्याप कंपनीने काहीही स्पष्ट केले नाही.

रिलायन्स जिओने नुकताच मोबाईल फोन लाँच केला. देशभरातील ५० कोटी ग्राहकांपर्यंत मोबाईल फोन यूजर्सपर्यंत पोहोचवण्याचा रिलायन्स जिओचा प्रयत्न आहे. आठवड्याला ५० लाख फोन विकण्याचे लक्ष्य कंपनीने निश्चित केले आहे. या फोनसाठी दीड हजार रुपये डिपॉझिट घेण्यात येणार आहे. प्री-बुकिंगसाठी ५०० रुपये दिल्यानंतर उर्वरित हजार रुपये फोन डिलिव्हरीच्या वेळेस द्यावे लागणार आहेत. कंपनीच्या माहितीनुसार, हा फोन यूजर्सने तीन वर्षे म्हणजेच ३६ महिने वापरल्यास ते दीड हजार रुपये त्याला परत देण्यात येतील. याचाच अर्थ हा फोन ग्राहकाला फुकटच मिळणार आहे. आतापर्यंत जिओची ६० लाख नोंदणी केली आहे. जिओचा फोन या महिन्याच्या अखेरीस ग्राहकांच्या हाती येण्याची शक्यता आहे.