हिंदू-मुस्लिमच्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर इंटरनेटवर अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होतात. कधीकधी अनेक बनावट व्हिडीओ आणि फोटो देखील सामाजात तेढ निर्माण करतात. पण अनेक वेळा असेही व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत असतात, जे दोन्ही धर्माच्या लोकांना एकत्र जोडतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला एक वेगळीच अनुभूती येईल. अंगावर शहारा आणणारा हा आवाज एकदा ऐकाच.

मुस्लिम व्यक्तीने महाभारताचं टायटल ट्रॅक गायलं
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ कोणत्या सेलिब्रिटीचा नसला तरी नेटकरी मंडळी या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाइक्स देताना दिसून येत आहेत. या व्हिडीओमध्ये एक मुस्लिम व्यक्ती महाभारताचं टायटल ट्रॅक गाताना दिसून येतोय. त्यांच्या सुरांनी लोकांची मनं जिंकली आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही मंत्रमुग्ध व्हाल. चला तर मग उशीर न करता सर्वात आधी हा व्हिडीओ पाहू.

नेटकरी म्हणाले, “मौलाना चाचा म्हणजे सच्चे हिंदुस्थानी”
हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच बराच लोकप्रिय झाला. हा व्हायरल व्हिडीओ ‘डॉक्टर नगर’ नावाच्या युजरने त्याच्या ट्विटर हँडलवरून एक मजेदार कॅप्शन देत शेअर केला आहे. यात त्यांनी लिहिलं आहे की, काही व्हिडीओज आपल्याला खूपच आनंद देऊन जातात. नेटकरी मंडळींनी हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करत कमेंट बॉक्समध्ये मौलादा चाचांची स्तुती केली आहे.

एका युजरने लिहिलं की ‘इतरांच्या धर्माचा आदर करणे कधीही कोणाच्या धर्माला कमी करत नाही किंवा धर्माचं कोणतंही नुकसान होत नाही.’ तर दुसऱ्या युजरने लिहिलं की ‘तुम्ही खूप सुंदर गोष्ट सांगितली आहे, शांतता आणि परस्पर सहकार्याने प्रगतीकडे जाण्याचा हा एकमेव मार्ग आहे.’ या व्यतिरिक्त बऱ्याच युजरने या व्हिडीओचं जोरदार कौतुक केलं आहे.

काही युजर्सना या व्हिडीओने रामायण आणि महाभारत या मालिकाच्या सोनेरी दिवसांची आठवण करून दिली. या व्हिडीओला आतापर्यंत ६.३ हजार लोकांनी लाइक केलं आहे आणि १,१०० पेक्षा जास्त लोकांनी रीट्वीट केलं आहे. भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त डॉ.एस.वाय. कुरैशी यांनी सुद्धा हा व्हिडीओ शेअर केला असून त्याला आतापर्यंत जवळपास १ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओबद्दल तुम्हाला काय वाटतं ते जरूर कळवा.

Story img Loader