राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना झुकतं माप दिलं जातं, आम्हाला विकास कामांसाठी निधी मिळत नाही असे आरोप शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांनी महाविकास आघाडीवरील कारभारावर करत बंड पुकारलं. याच बंडातून राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अनेक बंडखोर आमदारांनी शिवसेना फोडल्याचा आरोप केलाय तर अजित पवार यांनी निधी उपलब्ध करुन दिला नाही किंवा निधी देताना भेदभाव केल्याचे आरोप करण्यात आलेत. मात्र आज अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे स्वीय सहाय्यक सुनीलकुमार मुसळे यांनी ‘स्टेट्समन – अजित पवार’ मथळ्याखाली लिहिलेल्या वाढदिवस विशेष पोस्टमध्ये दोन प्रसंगाची आठवण करुन देत अजित पवार हे कायमच राजकारणापेक्षा लोकांच्या कामांना प्राधान्य देत असल्याचं म्हटलंय.

नक्की पाहा >> Photos: “कपडे काढायला लावा मला”, “मी लस घेताना फोटो काढला तर…”, “मी जेव्हा शपथ…”, “सूनेत्रा तर…”; अजित पवारांची गाजलेली वक्तव्यं

“एकेकाळी अजित पवारांचे सहकारी राहिलेल्या मात्र राजकीय हेतूने प्रेरीत झाल्याने अचानक निधीबाबत व्यर्थ दोष देऊन त्यांच्या बदनामीचे कारस्थान काही काळापासून घडत आहे. सहकाऱ्यांचीच काय पण विरोधकांची देखील सार्वजनिक हिताची कामं प्राधान्याने करणारे अजित पवार यांच्या सहकारी, विरोधकांनी सांगितलेल्या काही आठवणींना आज उजळा देणे क्रमप्राप्त ठरते,” असं म्हणत मुसळे यांनी बच्चू कडू यांच्या मतदारसंघामध्ये केलेल्या मदतीचा पहिला किस्सा सांगितला आहे.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP vs Congress : डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं?
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…

बच्चू कडू यांच्या मतदारसंघामधील १०५ गावांचा प्रश्न सोडवण्यासाठी अजित पवार यांनी, “काय असेल ते असेल, वेळ प्रसंगी राज्याचे बजेट त्यावर खर्ची घालू, पण बच्चू कडू यांची मागणी पूर्ण झाली पाहिजे,” अशी भूमिका घेतल्याची आठवण मुसळे यांनी करुन दिलीय. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी बच्चू कडूंच्या शब्दांमध्येच हा प्रसंग सांगितलाय. बच्चू कडू यांनी असं म्हटलं होतं की, “अजित पवार जलसंपदा आणि पाणीपुरवठा मंत्री असताना माझ्या मतदारसंघात पूर्णा प्रकल्पातून १०५ गावांना पाणीपुरवठा करणारी केंद्र सरकारची योजना होणार होती. ज्या गावांमध्ये दुषित आणि पिण्यासाठी अयोग्य पाणी आढळलं त्या गावांसाठी ही योजना राबवण्यात येणार होती. परंतु ही पाईपलाइन माझ्या मतदारसंघातून जात होती. त्यामुळे ज्या गावांच्या शेजारून ही पाईपलाइन जात आहे त्या गावांनाही या पाण्याचा लाभ मिळायला हवा अशी माझी मागणी असल्याने ही योजना मी वर्षभर अडवून ठेवली. हे अजित पवारांना समजलं, त्यांनी तातडीने बैठक ठरवली. सर्व संबंधित खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. तांत्रिकदृष्ट्या माझी मागणी योजनेत बसणारी नसतानाही ती व्यावहारिकदृष्ट्या योग्य असल्याचे अजित पवारांच्या लक्षात आलं. तेव्हा त्यांनी, अधिकाऱ्यांना ठामपणे बजावले कि ‘काय असेल ते असेल, वेळ प्रसंगी राज्याचे बजेट त्यावर खर्ची घालू, पण यांची मागणी पूर्ण झाली पाहिजे.’ अजित पवार पाणीपुरवठा मंत्री होते म्हणूनच हे होऊ शकले. माझ्यासारख्या अपक्ष आमदाराला मतदारसंघातल्या विकासकामासाठी चौकटीच्या बाहेर जाऊन केलेली मदत व्यक्तिगत माझ्यासाठी आणि मतदारसंघातल्या जनतेसाठी अत्यंत महत्वाची ठरली. तसेच अचलपूर पाणीपुरवठा योजनेत स्थानिक स्वराज्य संस्थांचं अंशदान म्हणून २५ कोटी रुपये भरावे लागणार होते. ही रक्कमही त्यांनी कमी करून दिली.”

नक्की वाचा >> “अजित पवार म्हणजे महाराष्ट्राचे जॉर्ज वॉशिंग्टन, समोरील वेळेत आले नाही म्हणून…”; जवळच्या व्यक्तीकडून वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

बच्चू कडू यांनी पुढे, “अजित पवारांच्या या कणखरपणामुळे मी भारावून गेलो. त्यांच्या कणखरपणाच्या आत एक अत्यंत जिव्हाळ्याचा आणि आत्मीयतेचा माणूसही दडलेला आहे. या कणखरपणाला नेहमीच सलाम करतो,” असं म्हणाल्याचंही मुसळे यांनी नमूद केलं आहे.

दुसरा प्रसंग सांगताना मुसळे यांनी, “राज्य सहकारी बँकेची निवडणूक असताना अजित पवार बैठक बोलावतात आणि सर्वपक्षीय लोकांना संचालक मंडळावर संधी द्यायचे ठरवत स्वतःच्या पक्षाच्या कोट्यातली उमेदवारी प्रतिस्पर्धी पक्षाचे नेते, विरोधक स्व. पांडुरंग फुंडकर साहेब यांना देत त्यांना निवडून आणतात,” अशी आठवण सांगितली आहे.

नक्की वाचा >> …म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने ‘झाडी, डोंगार, हाटील’ फेम शहाजीबापू पाटलांना पाठवली साडी

भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघासाठीही अजित पवार यांनी १८० कोटींचा निधी तातडीने मंजूर केल्याची आठवणही मुसळे यांनी सांगितलीय. “सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघातील ‘हुमन प्रकल्प’ त्यांच्या मतदारसंघातील लोकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असताना त्या प्रकल्पासाठी १८० कोटी रुपयांचा निधी (एनपीव्ही) मिळावा म्हणून मुनगंटीवार जेव्हा मदत मागतात तेव्हा अधिकाऱ्यांचा नकार असतानाही आपल्या विरोधकाबद्दल कटुता मनात न ठेवता अजित पवार सिंचन विभागातून एका दमात १८० कोटीची तरतूद करून देतात,” असं मुसळे यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.

“अजित पवार कधीही राजकीय हेतूनं सार्वजनिक कामं अडवत नाहीत मग ती आपल्यावर राजकीय स्वार्थापोटी विखारी, धादांत खोटी टीका करणाऱ्या विरोधकांची का असेना हेच वारंवार अधोरेखित होत राहते,” असा टोला मुसळे यांनी या पोस्टमधून विरोधकांना लगावला आहे.

नक्की वाचा >> फडणवीस समर्थकांकडून शाहांबद्दल नाराजी व्यक्त केली जात असतानाच शाह मोदींचा उल्लेख करत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांना…”

तसेच पोस्टच्या शेवटी त्यांनी, “विरोधकांच्या सार्वजनिक हिताच्या कामांचा निधी रोखणे, अडवणे, जिरवणे आजकालच्या राजकीय संस्कृतीत सर्रास सुरु असतांना जस्टीस आणि फेअर प्ले या उदारमतवादी पाश्चत्य संकल्पनेवर आधारभूत असलेली ‘स्टेट्समनशिप’ कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे अजित पवार आहेत,” असं म्हटलंय.

Story img Loader