राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना झुकतं माप दिलं जातं, आम्हाला विकास कामांसाठी निधी मिळत नाही असे आरोप शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांनी महाविकास आघाडीवरील कारभारावर करत बंड पुकारलं. याच बंडातून राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अनेक बंडखोर आमदारांनी शिवसेना फोडल्याचा आरोप केलाय तर अजित पवार यांनी निधी उपलब्ध करुन दिला नाही किंवा निधी देताना भेदभाव केल्याचे आरोप करण्यात आलेत. मात्र आज अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे स्वीय सहाय्यक सुनीलकुमार मुसळे यांनी ‘स्टेट्समन – अजित पवार’ मथळ्याखाली लिहिलेल्या वाढदिवस विशेष पोस्टमध्ये दोन प्रसंगाची आठवण करुन देत अजित पवार हे कायमच राजकारणापेक्षा लोकांच्या कामांना प्राधान्य देत असल्याचं म्हटलंय.
नक्की पाहा >> Photos: “कपडे काढायला लावा मला”, “मी लस घेताना फोटो काढला तर…”, “मी जेव्हा शपथ…”, “सूनेत्रा तर…”; अजित पवारांची गाजलेली वक्तव्यं
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा