राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा आज वाढदिवस. अजित पवार हे आज आपला ६३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. अनेक नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच एका खास व्यक्तीने अजित पवार यांना फेसबुक पोस्टमधून शुभेच्छा दिल्या आहेत. अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीमधील अनेक गोष्टी अगदी जवळून पाहणारे त्यांचे स्वीय सहाय्यक सुनीलकुमार मुसळे यांनी फेसबुकवरुन अजित पवार यांना खास शुभेच्छा दिल्यात.

नक्की पाहा >> Photos: “कपडे काढायला लावा मला”, “मी लस घेताना फोटो काढला तर…”, “मी जेव्हा शपथ…”, “सूनेत्रा तर…”; अजित पवारांची गाजलेली वक्तव्यं

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार यांच्यातील राजकारणी व्यक्तीमत्वापलीकडे ते कसे आहेत यासंदर्भात मुसळे यांनी आपल्या पोस्टमध्ये भाष्य केलं आहे. फेसबुकवर सात परिच्छेद असणारी लांबलचक पोस्ट मुसळे यांनी अजित पवारांसाठी लिहिलेली आहे. यामध्ये अजित पवार यांना असणारी स्वच्छतेची आवड ते त्यांचा वक्तशीरपणा अशा अनेक गोष्टींचा सविस्तर उल्लेख मुसळे यांनी केलाय. राजकीय दौऱ्यांपासून मंत्रालयापर्यंत नेहमीच अजित पवारांबरोबर असणाऱ्या मुसळे यांनी अजित पवारांच्या वक्तीमत्वाच्या अनेक पैलूंबद्दल आपल्या पोस्टमध्ये भाष्य केलं आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलं आहेत जाणून घेऊयात त्यांच्याच शब्दांमध्ये…

राज्याचे विरोधी पक्षनेते आदरणीय अजित दादा पवार यांच्या शिस्तीचे आणि वक्तशीरपणाचे अनेक किस्से महाराष्ट्रातील जनतेने ऐकले आहेत. दादांच्या राजकीय विरोधकांनी खुल्या दिलाने मांडले आहेत. तब्बल एक दशकाहून अधिक काळ दादांसोबत असल्याने मला प्रत्यक्षात ते नेहमीच अनुभवता आलेय.

नक्की वाचा >> …म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने ‘झाडी, डोंगार, हाटील’ फेम शहाजीबापू पाटलांना पाठवली साडी

प्रत्येक दौऱ्यात दादांच्या शिस्तीचा परिचय आल्याशिवाय राहत नाही. अजित दादा हे स्वच्छतेच्या बाबतीत फार शिस्तप्रिय आहेत. त्यांना कुठेही कचरा दिसला तर ते अधिकारी आणि कार्यकर्त्यांची कानउघडणी करत असतात. अनेक ठिकाणी दौऱ्यावर असताना अजित दादांना कार्यक्रमस्थळी कचरा आढळून आला असतांना त्यांनी स्वतः कचरा उचलत बाजूला केल्याची अनेक उदाहरणे आहेत. बरं ही प्रामाणिक तळमळ फक्त बारामती, महाराष्ट्र किंवा देशापुरता वावरताना मर्यादित नाहीये. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मंत्र्यांचा विदेश दौऱ्यावर असताना दादांबद्दलचा एक अनुभव सांगितला होता. दुसरं कोणीतरी रस्त्यावर टाकलेले चॉकलेटचे कव्हर दादांनी स्वतः उचलून कचरापेटीत टाकले होते.

सहसा भारतीय समाजजीवनात, राजकारणात वक्तशीरपणा अभावानेच आढळतो. बहुतांश राजकारण्यांना त्याचे वावडे असल्याने वेळा न पाळणे ही राजकीय फॅशन झाल्याचे आपल्याला दिसते. वक्तशीरपणाच्या बाबतीत जॉर्ज वॉशिंग्टन यांचे अनेक किस्से अमेरिकेत प्रसिद्ध असल्याचे माझ्या वाचनात आले. आपल्याकडच्या राजकीय नेत्यांसोबत मनोमन तुलना करताना अजित दादांचे नाव प्रकर्षाने त्यात समाविष्ट करावे लागेल. व्यासपीठावरील वा समोरील वेळेत नाही आले म्हणून दादा वेळेची चालढकल करताना आजतागायत दिसले नाही. कार्यक्रम, बैठक, प्रचारसभा अगदी दिलेल्या वेळीच हजर राहण्याचा पायंडा आजतागायत चुकला नाही.

नक्की वाचा >> फडणवीस समर्थकांकडून शाहांबद्दल नाराजी व्यक्त केली जात असतानाच शाह मोदींचा उल्लेख करत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांना…”

आजकाल कार्यकर्त्यांकडून पाय पडून घेणेच काय पाय धुवून घेणे वगैरे राजकीय ट्रेंड देशभर शिगेला पोचलेला दिसत असताना स्पष्टपणे पाटी लावून या सवंग गोष्टींना मनाई करत फक्त कार्यालाच सर्वोच्च प्राधान्य देण्याचा त्यांचा स्थायीभाव आहे.

हाती घेतलेले काम नियोजनानुसार यशस्वी पार पाडणे. स्पष्टवक्तेपणा, वेळ आणि ‘दिलेला शब्द पाळणे’ या उच्च नैतिक मूल्यांचा राजकारणात ऱ्हास झपाट्याने होतांना दिसतोय. प्रसिद्धीपिपासूपणा, लोकानुनय करण्याचा, खोटं बोलून वेळ मारून नेणे आता साधारण गोष्ट झालेली दिसते. आजपर्यंतच्या स्पष्ट, पारदर्शी कार्यपद्धतीमुळे सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर अजित दादांचे वेगळेपण उठून दिसते.

नक्की पाहा >> Photos: “पाया पडतो, भांडू नको…”; स्वत:च्याच लग्नात शहाजीबापूंनी पत्नीला सोन्याऐवजी दिलेले पितळ्याचे दागिने; कारण…

आज आदरणीय दादांच्या वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला अशा अनेक आठवणी, घटना, प्रसंग, क्षण डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या. आदरणीय दादा, शतायुषी व्हा! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सध्या मुसळे यांनी लिहिलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.