Akola viral video: अलिकडे हृदयरोगांचा धोका तरूणांनाही जास्त होत आहे. बदलती लाइफस्टाईल आणि चुकीच्या सवयींमुळे ही समस्या अधिक वाढत आहे. तरीही लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि तब्येत बिघडवून घेतात. अशात तुम्हाला जर जास्त जगायचं असेल तर हृदय निरोगी ठेवण्याशिवाय पर्याय नाही. ते निरोगी ठेवण्यासाठी काही खास आहार घ्यावा लागेल. मात्र जो आहार आपण पौष्टिक म्हणून खातो तोच जर भेसळयुक्त असेल तर. गेल्या काही दिवसांपासून बाराजात प्रत्येक गोष्टीत भेसळ होताना दिसत आहे. अगदी तांदूळ-डाळीपासून ते फोडणीच्या पदार्थापर्यंत, तेलापर्यंत भेसळ असल्याच्या घटना समोर येत आहेत. आता त्यातच आणखी एक टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. अकोल्यात सिमेंटचे लसूण सापडले आहेत. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.होय, काही विक्रेते चक्क सिमेंटचा लसूण विकत आहेत. या लसणाचे व्हिडीओ व्हायरल होत असून राज्यभरात यावर संताप व्यक्त केला जात आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

या लसणीच्या पाकळ्याही वेगळ्या होत नव्हत्या. जेव्हा त्याने नीट पाहिला तेव्हा लक्षात आलं तो संपूर्ण लसूण सिमेंटचा आहे. तेव्हा ग्राहकाच्या पायाखालची जमीन सरकली. जर तुम्ही बाजारातून लसूण विकत घेऊन घरी आणत असाल तर काळजी घ्या. हा लसूण तुमच्या जेवणाची चव वाढवणार नाही, पण तोंडात येताच तुमचे दात नक्कीच तुटतील. जर ते पोटात गेले तर शस्त्रक्रिया देखील होऊ शकते. आम्ही असे म्हणत आहोत कारण ‘सिमेंट केलेला लसूण’ आता बाजारात आला आहे.

Young woman threatened suicide did scene in road accused man for making her private video viral
“का केलेस माझे खासगी व्हिडीओ व्हायरल?” तरुणीनं भर रस्त्यात घातला राडा; शेवटी आत्महत्येची धमकी दिली अन्.., पाहा धक्कादायक VIDEO
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Girlfriend boyfriend kiss video viral obscene video of one girl and two young man went viral on social media
“अगं जरा तरी भान ठेव”, भररस्त्यात एकाला केलं किस अन्…, दोन तरुणांबरोबर तरुणीचे अश्लील चाळे! VIDEO पाहून कपाळावर माराल हात
Man Uses Washing Machine For Drying Wheat Desi Jugaad funny Video Goes Viral on social media
पुणे-मुंबईतल्या महिलांचं टेंशनच गेलं; ओले गहू सुकवण्यासाठी तरुणानं शोधला जबरदस्त जुगाड, VIDEO एकदा पाहाच
video of marathi ukhane
Video : “…राव आहे अजय देवगण तर मी आहे रविना टंडन” विदर्भातील महिलांनी घेतले भन्नाट उखाणे
How to prevent oil splashing when frying Chillies
मिरची तळताना तेल अंगावर उडते? हुशार सुनबाईंनी शोधला भन्नाट जुगाड, Viral Video पाहून बघाच
Muramba
Video: “ही रमाच आहे की…”, माहीच्या ‘त्या’ कृतीमुळे अक्षयला येणार संशय; ‘मुरांबा’ मालिकेत ट्विस्ट
Shiva
Video : “मी सगळं केलं…”, दिव्याचे सत्य समोर आल्यावर शिवा तिच्या कानाखाली देणार; पाहा मालिकेत पुढे काय घडणार?

सांगा या लोकांना कोणती शिक्षा करावी

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सिमेंटचा आणि खरा लसूण अगदी सारखाच दिसत आहे. त्यामुळे बाजारात अशाप्रकारे तुमचीही फसवणूक होऊ शकते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा असा भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना कोणती शिक्षा द्यायला हवी.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> चोरी करण्याची ‘ही’ पद्धत पाहा आणि सावध व्हा; अशी चोरी केली की VIDEO पाहून गोंधळून जाल

लसूण बनावट आहे की नाही कसं ओळखायचं?

भेसळयुक्त लसूण हा संपूर्ण पांढरा शुभ्र असतो. त्याच्या पाकळ्याही घट्ट असतात. त्या सहज निघत नाहीत. तर खऱ्या ओरिजनल लसणीची प्रत्येक पाकळी तुम्ही वेगळी करून सोलू शकता. त्यामुळे पुढच्या वेळी लसूण खरेदी करताना हे नक्की लक्षात ठेवा,

तसेच लसूण ही शुभ्र पांढरी नसते. त्यावर हलसे पिवळट, गुलाबी किंवा थोडी वेगळी छटा या पाकळ्यांवर असते. लसूण भेसळयुक्त आहे की नाही हे ओळखण्यासाठी लसणीच्या वरचा आणि टोकाचा भाग आवर्जून तपासावा.

Story img Loader