Akola viral video: अलिकडे हृदयरोगांचा धोका तरूणांनाही जास्त होत आहे. बदलती लाइफस्टाईल आणि चुकीच्या सवयींमुळे ही समस्या अधिक वाढत आहे. तरीही लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि तब्येत बिघडवून घेतात. अशात तुम्हाला जर जास्त जगायचं असेल तर हृदय निरोगी ठेवण्याशिवाय पर्याय नाही. ते निरोगी ठेवण्यासाठी काही खास आहार घ्यावा लागेल. मात्र जो आहार आपण पौष्टिक म्हणून खातो तोच जर भेसळयुक्त असेल तर. गेल्या काही दिवसांपासून बाराजात प्रत्येक गोष्टीत भेसळ होताना दिसत आहे. अगदी तांदूळ-डाळीपासून ते फोडणीच्या पदार्थापर्यंत, तेलापर्यंत भेसळ असल्याच्या घटना समोर येत आहेत. आता त्यातच आणखी एक टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. अकोल्यात सिमेंटचे लसूण सापडले आहेत. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.होय, काही विक्रेते चक्क सिमेंटचा लसूण विकत आहेत. या लसणाचे व्हिडीओ व्हायरल होत असून राज्यभरात यावर संताप व्यक्त केला जात आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा