Viral video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. त्यात अनेक व्हिडीओ मजेशीर असतात. मात्र, काही व्हिडीओ असे असतात की; जे पाहून काळजाचा ठोका चुकतो. हे व्हिडीओ अनेकदा धडकी भरविणारे असतात तर काही व्हिडीओ विचार करायला भाग पाडतात. अशातच एक संतापजनक व्हिडीओ सध्या समोर आला आहे, हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल “देवा सुंदर जगामंदी का रं माणूस घडविलास” माणूस इतका स्वार्थी झालाय की त्यानं मेलेल्या मोरावरही दया दाखवली नाही. रस्त्याच्या कडेला मृत पावलेल्या मोराबरोबर लोकांनी काय केलं तुम्हीच पाहा.

माणुसकीला काळीमा फासणारी घटना

लोक स्वतःच्या फायद्यासाठी कुठल्याही थराला जातात. कधी मेलेल्या मोराची पिसे उपटली जातात, तर कधी पिसांसाठी मोराला मारले जाते. सध्या सोशल मीडियावर माणुसकीला काळीमा फासणारा व्हिडिओ व्हायरल होतोय, जो तुमचाही संताप होईल. मृत्यूनंतरही राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळख असलेल्या मोराला नरक यातना भोगाव्या लागल्या अन् त्याला कारणीभूत ठरला तो माणूस. मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणं ज्याला म्हणतात तोच प्रकार अकोल्या जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यात घडल्याचं पाहायला मिळालं.पातूरच्या एका रस्त्यालगत मृत अवस्थेत मोर आढळून आला होता, याच मृत पडलेल्या मोराचे पंख या मार्गावरुन जाणाऱ्या प्रवासी, नागरिकांनी तोडून नेल्याचं दिसून आलं. दरम्यान रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांनी निर्दयीपणे मृत मोराची मोर पीस काढत असतानाचा व्हिडिओ समोर आले आहेत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर मृतावस्थेत पडलेल्या मोराची पिसे उपटून काढताना लोकं दिसून येतात. तसेच, दुचाकी थांबवून एकाचं पाहून दुसराही तसंच करत असल्याचं दिसून येतं. राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराच्या मृत्यूनंतर अशी ह्रयदद्रावक घटना घडल्याने पक्षी प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, वनविभाग काय कारवाई करते? असा प्रश्नही विचारला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: नाद पाहिजे ओ, नादाशिवाय काय हाय; बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी भररस्त्यात थांबवली एसटी; शेवटी काय झालं पाहाच

हा व्हिडीओ सोशल मीडियावर @namune_नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.  अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत मोराची पिसे लुटणाऱ्यांना राक्षस म्हटले. तसेच, या सर्व लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी काहींनी केली.