Pune’s Music Lovers Go Wild at Alan Walker Concert : पुणे तिथे काय उणे हे म्हणतात ते उगाच नाही. पुणे आणि पुणेकरांची चर्चा जगभरात होते ती उगाच नाही. पुणेकर फक्त स्पष्टवक्तेपणा आणि पुणेरी पाट्यांसाठी नव्हे तर भाषेवरील आपल्या प्रेमासाठीही ओळखले जातात. जिथे पुणेकर आहे तिथे मराठी भाषेला मान हा मिळणारचं. असाच काहीसा प्रकार नुकताच आंतरराष्ट्रीय डीजे आणि संगीत निर्माता(international DJ and music producer ) ॲलन वॉकर शो मध्ये पाहायला मिळाला. आता इतका मोठा आतंराष्ट्रीय डीजेने चक्क आपल्या कॉन्सर्टमध्ये प्रसिद्ध मराठी गाणे वाजवलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा –पुणेकरांचा लाडका बाप्पा! श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भक्तांची भली मोठी रांग, Viral Video पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Kajol reveals weirdest rumour about her
काजोल प्रवास करत असलेलं विमान क्रॅश झालंय; अभिनेत्रीच्या आईला कोणीतरी फोन करून सांगितलं अन्…; काय घडलेलं?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
झोमॅटो डिलिव्हरी बॉयने शिवीगाळ केल्याचा महिलेचा दावा; नेटकऱ्यांनी महिलेलाच केलं ट्रोल, पण का? जाणून घ्या नक्की काय घडलं?
video of school students hugging each other in classroom went viral on social Media obscene video viral
भरवर्गात त्यानं तिला…, शाळेत विद्यार्थ्यांचे अश्लील चाळे; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही तर हद्दच…”
Puneri patya viral puneri pati outside hospital funny puneri poster goes viral
PHOTO:“मी डॉक्टर आहे इंजेक्शनसाठी…” दवाखान्याबाहेर पेशंटसाठी लिहलेल्या सूचना वाचून पोट धरुन हसाल
Viral shocking accident while overtaking The Car Fell From The Bridge While Overtaking Accident Video
अंगावर काटा आणणारा अपघात, पुलावरून कार थेट खाली कोसळली; VIDEO पाहून सांगा नेमकी चूक कुणाची?
Viral Video car pati
“जितके तुम्ही विरोधात तितके आम्ही….”; कारवरील पाटीची का होतेय एवढी चर्चा, पाहा Viral Video
Arranged Marriage Goals
“Arranged Marriage असं गाजवा की लोकांना Love Marriage वाटलं पाहिजे!”, हळद लागताच नवरा-नवरीने केला भन्नाट डान्स, Video Viral


सध्या देशात अनेक आंतरराष्ट्रीय स्टारचे म्युझिक कॉन्सर्ट सुरु आहे. काही दिवसांपूर्वी भारतात आगामी काळात होणाऱ्या कोल्डप्लेच्या म्युझिक कॉन्सर्टची जोरदार चर्चा सुरु होती. आगामी काळात कोल्डप्ले, ड्युआ लिपा, ब्रायन ॲडम्स आणि कोरिअन पॉपस्टार यांचे म्युझिक कॉन्सर्ट पार पडणार आहे. दरम्यान सध्या आंतरराष्ट्रीय डीजे आणि संगीत निर्माता(international DJ and music producer ) ॲलन वॉकर हा इंडिया टूर आहे. EDM सुपरस्टार ॲलन वॉकर सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत मुंबई, बेंगळुरू, दिल्ली NCR आणि कोलकाता यासह १० शहरांमध्ये आपल्या परफॉर्मन्ससह भारताचा दौरा करणार आहे. त्याचे “फेडेड” आणि “अलोन” सारख्या हिट गाण्यांवर नाचण्यासाठी उत्साही आहेत.

दरम्यान पुण्यात शुक्रवारी १८ ऑक्टोबर रोजी खराडी येथील मैदानावर ॲलन वॉकरचा म्युझिक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. तेव्हा पुणेकरांनी त्याच्या गाण्यावर नाचण्याचा आनंद लुटला. इतका मोठा स्टार जर पुण्यात आला तर त्यालाही मराठी गाण्याचा मोह होणे सहाजिक आहे. आंतरराष्ट्रीय स्टार ॲलन वॉकरने आपल्या शोमध्ये चक्क प्रसिद्ध मराठी गाणे तांबडी चामडी हे गाणे वाजवले आहे. मराठी गाणं ऐकताच पुणेकरांनी एकच जल्लोष करत त्यावर डान्स केला. अ‍ॅलनने देखील या गाण्यावर थिरकताना दिसला. व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.

इंस्टाग्रामवर framingpune नावाच्या पेजवर व्हिडिओ शेअर केला आहे. व्हायरल व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, मराठी वाजलंच पाहिजे. तसेच व्हिडीओवर दिसणाऱ्या मजकूरमध्ये लिहिले आहे की,” हे पुणे आहे भावा, इथे अ‍ॅलन वॉकरही मराठीच वाजवतो.”

हेही वाचा –व्वा रे पठ्या! “अशी मी मदन मंजिरी” गाण्यावर तरुणाचे भन्नाट नृत्य, थेट फुलवंतीला दिली टक्कर, पाहा Viral Video

व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंटही केल्या आहेत. एकाने कमेंट केली की, “तो अ‍ॅलन वॉकर नाही अनिल वायकर आहे”
दुसऱ्याने लिहिले की,”मराठी माणसाने लावून धरली तर देश काय जग दखल घेते.”
तिसऱ्याने कमेंट केली, “अ‍ॅलन पुणेकर”

Story img Loader