Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ मनाला सुखावणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आळंदीचा सुंदर परिसर दाखवला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही भारावून जाल.
आळंदीला देवाची आळंदी असे सुद्धा संबोधले जाते. हे एक तीर्थक्षेत्र प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर यांचे आळंदी हे समाधीस्थान आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेले आळंदी हे गाव इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आहे. या तीर्थक्षेत्राला अलौकिक सौंदर्य लाभले आहे. विठूनामाचा आणि ज्ञानेश्वर माऊलीचा जयघोष करत दर दिवशी हजारो भाविक येथे येतात. टाळ मृदंगाच्या गजरात येथे वारकरी तल्लीन झालेले दिसून येतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला तीर्थक्षेत्र आळंदीच्या मंदिराचे दर्शन घेता येईल. सुरुवातीला तुम्हाला मंदिराचा परिसर दिसेल. इंद्रायणी नदीवरील नयनरम्य दृश्य दिसेल. त्यानंतर तुम्हाला नदीकाठी एका द्रोणामध्ये दिवा पेटवलेला दिसेल. इंद्रायणीच्या नदीत काही लोकं स्नान करताना दिसत आहे. त्यानंतर शेवटी श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिराकडे जाणारे महाद्वार दिसेल. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आळंदीला जाऊन श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिराचे दर्शन घ्यायला आवडेल. या व्हिडीओमध्ये भक्तांची गर्दी सुद्धा दिसून येत आहे.
या व्हिडिओवर कॅप्शन लिहिलेय, “देवाची आळंदी” हा व्हिडीओ पाहून तुम्हाला या ओळी म्हणावे असे वाटेल, “चला आळंदीला जाऊ। ज्ञानेश्वर डोळा पाहू।।१।। होतील संतांचिया भेटी।सांगू सुखाचीया गोष्टी ।।२।। ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ।” ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी समाधी घेतली होती.
हेही वाचा : चुलीवरची भाकर! गावाकडची माणसं प्रत्येक क्षणाचा आनंद घेतात, व्हिडीओ होतोय व्हायरल
ek_puneri या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “दिवसाची सूरवात माऊलींच्या दर्शनाने” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “माऊली” तर एका युजरने हार्टचा इमोजी शेअर केला आहे.