Shocking video: भाऊ जरा चांगली आणि ताजी भाजी द्या…भाजी विकत घेताना हे वाक्य नेहमीच आपल्या तोंडी असतं. भाजी विकत घ्यायची म्हटली तर आपण ती भाजी ताजी आहे की नाही याची सारखी विचारणा विक्रेत्याला करत असतो. कुटुंबाचं आणि आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी डॉक्टरही हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला देत असतात. पण तुम्ही विकत घेतलेली भाजी ही नेहमीच तुमच्यासाठी आरोग्यदायी ठरेल असं नाही. सध्या असा समोर आला आहे की हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पालेभाजी विकत घेताना शंभर वेळा विचार कराल.
हिवाळ्यात पालेभाज्या चांगल्या मिळतात या उद्देशाने त्या अनेकदा आवडीने खाल्या जातात. मात्र आता थोडे व्हा अलर्ट. कारण सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा व्हिडिओ. ज्यामध्ये पालकच्या पानांसारखाच दिसणारा हा किडा दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दावा केला जात आहे की आपण भाजीपाल्यासोबतच किडे पण खात आहोत. सोबतच बोलले जात आहे की पालकाच्या भाजीवर छोटे वळवळणारा हा कीडा पालकमधून आपल्या पोटात जात आहे. हे तुम्हाला थोडं विचित्र वाटेल पण हे खरं आहे. त्यामुळे पालक भाजी घेताना थोडे सावधान.
एका महिलेनं घरी पालक आणली आणि तिच निवडताना तिला हा किडा दिसला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ही महिला सुरुवातीला हा छोटा साप असल्याचं म्हणतेय पण हा साप नाहीये तर वळवळणारा किडा आहे. नशीब या महिलेला पालक निवडतानाच हा किडा दिसला नाहीतर हा किडा पोटात गेला असता. भाजीपाल्यामध्ये किडे असणे ही तशी सामान्य गोष्ट आहे. म्हणूनच जाणकार नेहमी भाजी पूर्णपणे धुऊन खाण्याची शिफारस करतात. कारण हे किडे शरीरात पोहोचले तर अनेक आजार होऊ शकतात. बहुतेक लोक भाज्या शिजवण्यापूर्वी पाण्याने भाज्या धुतात खऱ्या, परंतु साफसफाईची ही पद्धत भाजीमधील किडे नष्ट करण्यासाठी प्रभावी नाही. याच्या मदतीने तुम्ही फक्त भाज्यांवरील धूळ आणि माती काढू शकता. तसे तर सर्व भाज्यांमधून असे किडे काढून टाकणे सोप्पे काम नाही. त्यामुळे कोणतीही भाजी १०, १५ मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा, यामुळे किडे निघून जातात.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा फोटो thesonalikabharti नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून नेटकरीही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय “किती काळजी घ्यायची” तर आणखी एकानं “आता खायचं तरी काय, जगायचं की नाही” अशी प्रतिक्रिया दिली आहे.