कित्येक लोकांना देशात आणि जगभरात फिरण्याची हौस असते. त्यांच्या सोशल मीडियावर डोकावले तर तुम्हाला त्यांचे अनेक रोमांचक अनुभव आणि सुंदर दृश्यांचा खजिना मिळेल. प्रवासाची आवड असलेल्या अशाच एका तरुणीने तिच्या इंस्टाग्रामवर असे काही शेअर केले असेले जे पाहून तुम्ही थक्क व्हाल. Alexandra Blodgett ने नुकतीच ग्वातेमाला (Guatemala) या ठिकाणी भेट दिली होती जे सक्रिय ज्वालामुखीसाठी ओळखले जाणारे ठिकाणी आहे. येथे धगधगते सक्रिया ज्वालामुखी तर तिने पाहिलेच पण त्याबरोबर, येथे तिने आगळ्या-वेगळ्या पद्धतीने तयार केलेला पिझ्झा देखील खाल्ला आहे. चला जाणून घेऊ या तिचा अफलातून अनुभव.

तरुणीने धगधगत्या ज्वालामुखीवर भाजून खाल्ला पिझ्झा

अलेक्जेंड्रा ही काही दिवसांपूर्वी ग्वातेमाला येथे ज्वालामुखी पाहण्यासाठी गेली होती. या तरुणीने येथे फक्त धगधगता ज्वालामुखीच पाहिला नाही तर त्यावर चक्क पिझ्झा भाजून खाल्ला आहे. तुम्हाला हे वाचून कदाचित विश्वास बसणार नाही पण हे खरोखर घडले आहे. या सर्व घटनेचा व्हिडीओ तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, ”होय मी मान्य करते की आम्ही यासाठी येथे आलो नव्हतो पण हा आमच्यासाठी बोनस होता.”

Raja Ranichi Ga jodi Fame Actress Kelvan
फिश फ्राय, सोलकढी, गोडाचे पदार्थ अन्…; ‘राजा राणीची गं जोडी’ फेम अभिनेत्रीचं ‘असं’ पार पडलं केळवण, फोटोंनी वेधलं लक्ष
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
love became mistake chatura
आयुष्याची घडी विस्कटवणारी वादळवाट…
Bollywood actor varun Dhawan reveals wife of a powerful man broke into his house without permission
वरुण धवनच्या घरात घुसली होती चाहती, प्रसंग सांगत अभिनेता म्हणाला, “एका पॉवरफुल व्यक्तीची ती पत्नी होती अन्…”
winter will take break Meteorological Department predicts
थंडीला लागणार ‘ब्रेक’, हवामान खात्याचा पावसाचा अंदाज
Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar
स्वत:ला आगीत झोकून सिलिंडर बाहेर काढणाऱ्या करिनाच्या धाडसाची दखल…
a child girl cried as young girl asked questions to her
VIDEO : तरुणीचा प्रश्न ऐकताच चिमुकली ढसा ढसा रडायला लागली.. नेटकरी म्हणाले, “थेट काळजावर..”
shocking video
अरे देवा! दुसऱ्याच्या घरातील फुलाची कुंडी चोरताना दिसली महिला, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “कसे लोक आहेत..”

हेही वाचा – डिलिव्हरी बॉयसाठी तरुणाने सुरु केलं Relax Station; समोसा-चहा-पाणी अन् रेनकोट देतो मोफत, पाहा प्रेरणादायी video

२०२१ मध्ये या ज्वालामुखीचा झाला होता उद्रेक
या ज्वालामुखीबाबत तिने सांगितले, ”हा सक्रिय ज्वालामुखी आहे. २०२१मध्ये येथील ज्वालामुखीचा शेवटचा उद्रेक झाला होता. येथे खूप गारवा आहे त्यामुळे आम्ही खूप कपडे घालून आलो आहोत.”

हेही वाचा – मासे पकडण्यासाठी हटके जुगाड! छत्री उघडली, पाण्यात टाकली अन्….पाहा व्हायरल व्हिडीओ

कच्चा पिझ्झा ज्वालामुखीवर ठेवून झाकला आणि…
व्हिडीओच्या सुरुवातीला एक व्यक्ती कच्चा पिझ्झा एका भांड्यावर घेऊन जमिनीमध्ये ठेवते आणि तो झाकताना दिसत आहे. येथे जमिनीखाली सक्रिय ज्वालामुखीत आहे ज्यावर ती पिझ्झा भाजते. काही वेळाने तो पिझ्झा बाहेर काढून सर्वजण त्यावर ताव मारताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये आगाळ्या वेगळ्या पद्धतीने तयार केलल्या पिझ्झाचा आनंद घेताना अलेक्जेंड्रा दिसत आहे.

जगातील एकमेव ज्वालामुखी पिझ्झा

एबीसी रिपोर्टनुसार ग्वाटेमाला येथील एक शहर San Vicente Pacaya एकमेव असे ठिकाण आहे जिथे ज्वालामुखीवर पिझ्झा भाजला जातो. पिझ्झा पकाया नावाने ओळखले जाणारे हे रेस्टॉर्ंट डेव्हट गार्सियाने सुरू केले होते. ज्वालामुखीच्या गुफांमध्ये काही पर्यटकांना मार्शमेलो भाजताना पाहून तिला या बिझनेसची कल्पना सुचली होती.

हेही वाचा – आरती ऐकून टाळ्या वाजवू लागले उंदीरमामा! भक्तीमय व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

किती आगळा वेगळा अनुभव आहे
व्हिडीओ २ जुलै रोजी पोस्ट केला होता. शेअर केल्यापासून या व्हिडीओला १० लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिले आहे आणि ही संख्या वाढतच जात आहे. तसेच व्हिडीओला कित्येक लाइक्स आणि कमेंट् मिळाल्या आहे. हा व्हिडिओवर एकाने कमेंट केली की ”हा किती आगळा-वेगळा अनुभव आहे” तर दुसऱ्याने म्हटले की, ”मी हे नक्की ट्राय करेल. मला वाटते की महा व्हिडीओ मला सांगतोय की ग्वाटेमाला जाण्याची वेळ आली आहे.”

Story img Loader