Viral video: आपल्या अतरंगी स्टाईलमुळे सतत चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदच्या अनोख्या स्टाईलचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. अनेकजण तिच्या हटके स्टाईलचं कौतुक करतात तर काहीजण तिला प्रचंड ट्रोल देखील करत असतात. मात्र, उर्फी कोणालाही न घाबरता आपली फॅशन आणि कपडे यांच्यात कोणताच बदल करत नाही. सध्या सोशल मीडियावर उर्फी प्रमाणे अनेकजण अतरंगी फॅशन करु लागले आहेत.

अती बोल्ड आणि त्याहूनही अतिवित्र कपडे. आपल्यावर कॅमेऱ्यांची नजर आहे की नाही यासाठी सतत केले जाणारे काही न काही पब्लिसिटी स्टंट्स करणारी आणि रिअॅलिटी शोमुळं (Reality show) प्रसिद्धीझोतात आलेली उर्फी जावेद सर्वांनाच माहितीये. अनेकजण उर्फी आम्हाला आवडत नाही बुवा, असं म्हणतात आणि तिनं नेमका काय अतरंगीपणा केला आहे हे वारंवार पाहतातही. अनेकांच्या मते तर, उर्फीसारखं दुसरं कुणीच नाही. पण, त्यांच्या या विचाराचा शह मिळाला आहे. कारण उर्फीच्याही पुढे कुणीतरी पोहोचलंय ज्याची एकच चर्चा सध्या पाहायला मिळते. यावेळी, ‘गुडिया’ नावाच्या एका महिला कंटेंट क्रिएटरने तिच्या विचित्र पोशाखाने सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतलंय. तिनं असं काही परिधान केलंय की पाहून तुम्हीही म्हणाल अरे हिनं तर उर्फीलाही मागे टाकलंय.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या मुलीनं १०० सिगारेटपासून ड्रेस तयार केलाय. ब्रॅलेट टॉप आणि गुडघ्यापर्यंतच्या स्कर्टवर सिगारेट आडव्या ओळींमध्ये व्यवस्थित लावण्यात आल्या होत्या. तिने तिच्या ड्रेसवर पारंपारिक दागिने, सोन्याचे कानातले, नेकलेस, बांगड्या आणि मांग टिक्का घातल्याचं दिसत आहे.व्हिडीओमध्ये ती सांगताना दिसत आहे की, “मी हे माझ्या स्वतःच्या हातांनी बनवले आहे. त्यात खूप मेहनत आणि पैसा खर्च झाला आहे. आम्हाला कोणत्याही मशीनचा वापर करून हे बनवता येत नाही, म्हणून आम्ही ते स्वतः हातांनी करतो. आम्ही हे विणण्यात कठोर परिश्रम करतो. आमच्या व्हिडिओसारखेच,” तिच्या ड्रेसमध्ये प्रत्येक ओळीत १० पेक्षा जास्त सिगारेट होत्या, जे संपूर्ण ड्रेस तयार करण्यासाठी १०० पेक्षा जास्त सिगारेटचा वापर झाला.

पाहा व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/DFiEtgutVVA/?utm_source=ig_web_copy_link

सोशल मीडियावर हा व्हिडीओ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.