‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम भारतीय मालिकांच्या इतिहातील सर्वात यशस्वी कार्यक्रम आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. पहिल्या पर्वापासूनच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सध्या केबीसीचे नववे पर्व सुरू आहे आणि नवव्या पर्वानंतरही याची प्रसिद्धी तसुभरही कमी झालेली नाही. या कार्यक्रमात भाग घेऊन कित्येकांची स्वप्नं पूर्ण झाली आहेत. अशा या कार्यक्रमात बिग बींसोबत मह्त्त्वाच्या भूमिकेत असतो तो म्हणजे कॉम्प्युटर. अमिताभ बच्चन आदराने त्याला ‘कॉम्प्युटर जी’ म्हणतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एक युक्ती; १६६ फोन आणि अॅमेझॉनला त्याने घातला लाखोंचा गंडा

या ‘कॉम्प्युटर जी’ संदर्भात एक प्रश्न प्रेक्षकांनी विचारला होता. बच्चन यांच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर नेमकं काय दिसतं? ती स्क्रीन कशी दिसते याबद्दल जाणून घेण्याचं कुतूहल अनेकांच्या मनात आहे. ‘क्वोरा’ या वेबसाईटवर यासंबधीचे प्रश्नही विचारले होते. या वेबसाईटवर प्रश्न विचारल्यास जाणकारांकडून त्याचं उत्तर दिलं जातं. केबीसीच्या पर्वात भाग घेतलेल्या आणि १२ लाख जिंकलेल्या अभिनव पांडे या स्पर्धकांनी यासंबधीचे उत्तर दिलं आहे. फास्टेस्ट फिंगर फर्स्टचे स्पर्धक असताना आपण बच्चन यांच्या थेट मागे बसलो होतो त्यामुळे त्यांच्या स्क्रीनवर काय काय दिसतं याची माहिती आपल्याला असल्याचा दावा त्याने केला आहे.

रशियन पर्यटकावर आली मंदिराबाहेर भीक मागण्याची वेळ, सुषमा स्वराज आल्या मदतीसाठी धावून

अमिताभ बच्चन यांच्या कॉम्प्युटरवर प्रश्न, पर्याय, स्पर्धकांकडे कोणत्या लाईफ लाईन्स शिल्लक आहे या संदर्भात माहिती दिलेली असते. त्याचप्रमाणे हॉट सीटवर आलेल्या स्पर्धकाची वैयक्तिक माहिती, आवड निवड, शहर यासारखी छोटी मोठी माहितीही दिलेली असते. विशेष म्हणजे जेव्हा एखादा प्रश्न विचारला जातो, त्यावेळी त्या प्रश्नाचं उत्तर अमिताभ बच्चन यांनाही ठावूक नसतं. स्पर्धकांनी आपलं उत्तर निवडून त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतरच त्याचं योग्य उत्तर बच्चन यांच्या स्क्रीनवर दाखवलं जातं, असंही अभिनव पांडे म्हणाले.