‘सटरफटर महाराज पुण्यतिथी’ ही सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. खरंतर सटर फटर महाराज हे नाव यापूर्वी तरी शहरी भागातल्या लोकांनी ऐकलं नव्हतं. त्यातूनही २४ तास सोशल मीडियावर असणाऱ्या नेटकऱ्यांना याबद्दल माहिती असण्याची शक्यता तशी क्वचितच. त्यामुळे अनेकांना याबद्दल कुतूहल निर्माण झालं. कालनिर्णयच्या मध्य महाराष्ट्रातील आवृत्तीत २२ मार्चच्या रकान्यात ‘सटरफटर महाराज पुण्यतिथी’ देण्यात आली होती, हे सटरफटर महाराज नेमके कोण? या उत्तराच्या उत्सुकतेपायी अनेकांनी सोशल मीडियावर विचारणाही केल्या.

सुमंगल प्रेसचे माजी संचालक तसेच ‘कालनिर्णयकार’ ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर याचे धाकटे सुपुत्र जयेंद्र साळगावकर यांनी अखेर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून सटरफटर महारांजाविषयी थोडक्यात माहिती शेअर केली आहे. जयेंद्र साळगावकर यांच्या फेसबुक पोस्टनुसार कालनिर्णयच्या प्रांतवार आवृत्या काढल्या जातात. मुंबई, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोल्हापूर, कोकण अशा या आवृत्त्या आहेत. त्यातील मध्य महाष्ट्रातील आवृत्तीत ‘सटरफटर महाराज पुण्यतिथी’ गेल्या पंधरा वर्षांपासून कालनिर्णय नमूद करत आहे. जयेंद्र साळगावकर यांनी ‘बोल भिडू’ वेबसाइटवर सटरफटर महाराजांवर प्रकाशित करण्यात आलेल्या लेखाचा संदर्भही दिला आहे.

Shri Sant Gajanan Maharaj devotees gathered in Shegaon
बुलढाणा: हजारो भाविकांचा मेळा, पावणेचारशे दिंड्या; शेगावात गजानन महाराज पुण्यतिथीचा उत्साह
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
Chhatrapati Shivaji Maharaj Statue
Chhatrapati Shivaji Maharaj : महाराष्ट्राबाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे कुठल्या राज्यांत आहेत?
Sindhudurg, Shivaji maharaj statue,
मालवण : शिव पुतळा दुर्घटना प्रकरणी जयदीप आपटेसह दोघांना १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue
Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue: ‘… तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला नसता’, नितीन गडकरींनी दाखवली ‘ती’ चूक
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका
New statue of Chhatrapati Shivaji Maharaj entered in Malvan Police is investigating
छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा मालवणमध्ये दाखल, पोलीस करत आहेत चौकशी
deepak kesarkar reaction on collapse of shivaji maharaj statue
या दुर्घटनेतून काहीतरी चांगले घडावे! शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी केसरकर यांची प्रतिक्रिया

धालेवाडीमध्ये साधरण १८७२ च्या सुमारास साधू महाराज आले होते. कालांतरानं हे महाराज धालेवाडीतच विसावले. महाराज गावात भिक्षा मागत, पण त्याचबरोबर गावकऱ्यांना अनेक औधषोपचारांचीही माहिती देत. या वेबसाईटच्या माहितीनुसार हळूहळू या महाराजांची किर्ती पंचक्रोशीत पसरली. महाराजांची महती ऐकून अनेकजण येत असत. महाराजांच्या किर्तनालाही अनेक लोक येऊ लागले. या महाराजांचं नाव काय याबद्दल अनेकंना कुतूहल होतं. अनेकांनी महाराजांकडे याबद्दल विचारणाही केली त्यावर नावात काय आहे मला म्हणा काहीतरी सटरफटर असं ते म्हणाले आणि तेव्हापासून या महाराजाचं ‘सटरफटर’ हे नावच पूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध झालं.