ट्विटर अकाऊंटवर अमिताभ बच्चन हे खूपच सक्रिय असतात. चालू घडामोडी घडल्या की काहीतरी वादग्रस्त ट्विट करायचं आणि चर्चेत यायचं असं त्यांचं कधीही नसतं. ते नियमित सोशल मीडियावर सक्रिय असतात, हे माध्यम किती प्रभावी आहे आणि एखादं मत आपण किती ताकदीने मांडू शकतो हे बच्चन यांना खूप चांगलं ठाऊक आहे. म्हणूनच वाद उकरून त्यात पोळी शेकून घेण्यापेक्षा तितक्यात संयमाने शांतपणे आणि विचारपूर्वक ते ट्विट करत असतात. अमिताभ बच्चन यांना ट्विटरवर फॉलो करणाऱ्यांच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की त्यांच्या ट्विटच्या आधी अनेकदा आकडे असतात ‘T 2469’ किंवा ‘T 2468’ वगैरे. आता तुम्हालाही या आकड्यांचा नेमका अर्थ काय हे जाणून घेण्याचं कुतूहल असेलच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक आणि समीक्षक भारती दुबे आणि दिलीप ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार हे आकडे म्हणजे अमिताभ बच्चन किती दिवसांपासून ट्विट करताहेत यासंदर्भातील आहेत. उदाहरण घ्यायचं झालं तर T 2469 हा आकडा म्हणजे ट्विटरवर ट्विट करण्याचा त्यांचा २४६९ वा दिवस आहे, असा अर्थ होतो. जसजसे दिवस पुढे जातात तसे हे आकडे बदलत जातात. मे २०१० मध्ये अमिताभ बच्चन यांनी ट्विटर अकाऊंट सुरू केले होते. १७ मे २०१० रोजी त्यांनी पहिलं ट्विट केलं होतं. तेव्हापासून ते नियमित ट्विटरवर सक्रिय आहेत.

जानेवारी २२, २०१० मध्ये अमिताभ बच्चन यांनी आपलं १ हजारांवं ट्विट केलं. अमिताभ बच्चन हे या आकड्यांबद्दल अधिक दक्षही असतात. ३० मे २०१७ रोजी अमिताभ यांनी ट्विट केलं होतं, त्याचा आकडा होता २४४० पण त्यांनी चुकून २४४१ लिहिले होते. तेव्हा त्यांनी पुन्हा ट्विट करून माझा ट्विटरवर सक्रिय असण्याचा हा २४४० वा दिवस आहे, असं सांगत अनवधानाने घडलेली चूक तात्काळ दुरुस्तही केली होती.
ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या यादीत अमिताभ बच्चन यांचंही नाव आघाडीवर आहे. वर्षभरापूर्वी भारतात ट्विटवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या यादीत अमिताभ बच्चन यांचं नाव पहिल्या क्रमांकावर होतं पण नंतर त्यांना मागे टाकत पतंप्रधान नरेंद्र मोदी हे अव्वल स्थानी आले. अमिताभ बच्चन यांचे ट्विटरवर २ कोटी ७५ लाख फॉलोअर्स आहेत. तर मोदींचे ३ कोटी ११ लाख फॉलोअर्स आहेत.