केएफसी म्हणजे केंटुकी फ्राईड चिकन हा ब्रँड मांसाहारी त्यातही चिकनप्रेमी मंडळींचा सर्वात आवडता ब्रँड. हारलँड सँडर्स यांनी १९३० मध्ये केंटुकी प्रांतात स्टेशनजवळ एक छोटंसं उपाहारगृह सुरू केलं होतं. आपल्या खास चिकन रेसिपीसाठी ते ओळखलं जायचं.  नंतर सँडर्स यांनी खास चिकन रेसिपीची फ्रँचायजी पीट हरमन याला देऊ केली. त्याबदल्यात सँडर्स यांना मोबदला मिळाला. पुढे कर्नल सँडर्सच्या खास चिकनचे नामकरण झाले ‘केएफसी’ असं झालं.

Viral Video : धक्कादायक! ‘हा’ व्हिडिओ पाहून विकृत माणसाची तुम्हाला चीड येईल

‘finger licking good’ या टॅगलाईनसह घरोघरी पोहोचलेल्या केएफसी चिकनच्या आज जगभरात शाखा आहे. केएफसी या ब्रँडचं ट्विटर हँडल आहे. केएफसीला ट्विटरवर सध्या एक कोटीहूंन अधिक लोक फॉलो करतात. पण हा ब्रँड मात्र ट्विटरवर फक्त ११ जणांनाच फॉलो करतो. एका फॉलोवरला याबद्दल प्रश्न पडला तेव्हा यामागचं कारणं शोधण्याचा त्यानं चंग बांधला. याबद्दल माहिती मिळवल्यानंतर त्याला यामागचं भन्नाट उत्तर सापडलं.

केएफसीच्या चिकनची रेसिपी ही पूर्णपणे गुपित ठेवण्यात आली आहे. ही रेसिपी कुठेही लीक होऊ नये याची पुरेपुर काळजी या ब्रँडने घेतली आहे. त्यामुळे ११ हर्ब्स आणि मसाले वापरून ही रेसिपी तयार करण्यात आली आहे एवढीच माहिती सगळ्यांना आहे. तेव्हा नवी मार्केटिंग स्ट्रटेजी म्हणून केएफसी हा ब्रँड फक्त अकरा जणांना फॉलो करतो. यात स्पाईस गर्ल बँडमधल्या ६ गायिकांचा आणि हर्ब नावानं सुरू होणाऱ्या पाच व्यक्तींचा समावेश आहे.

Viral Video : दिलखेचक अदा आणि दमदार नृत्याने दोघींनी केलं नेटकऱ्यांना घायाळ

Story img Loader