Crocodile Attack Viral Video : मगरीच्या जवळ जाणं म्हणजे मृत्यूच्या दारात जाण्यासारखंच होय. कारण मगर जगातील सर्वात खतरनाक शिकारींपैकी एक आहे. मगर तिच्या आसपास आलेल्या प्राण्यावर किंवा माणसावर जीवघेणा हल्ला करून तडफडून शिकार करते. जंगलाचा राजा सिंह, वाघ, बिबट्यासारखे प्राणीही तिच्यापासून चार हात लांबच राहतात. कारण मगरीच्या जबड्यात जो फसला त्याचा मृत्यू अटळ आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मगरीने माणसांवर आणि प्राण्यांवर प्राणघातक हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. तरीही एका माणसाने जिवंत मगरीला स्पर्श करण्याची हिंमत केली. पण त्याच्या विनाशकाले विपरीत बुद्धीमुळे मगरीला स्पर्श करण त्याच्या चांगलंच अंगलट आलं. मगरीच्या पाठीवर हात ठेवल्यानंतर काही सेकंदातच तिने त्या माणसावर खतरनाक हल्ला केला. हा थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा