केवळ भारतातच नाही तर जगभरातील लोकांना दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ चित्रपट खूप आवडला. या चित्रपटातील गाण्यांपासून ते संवादांपर्यंत हा चित्रपट सोशल मीडियावर खूप लोकप्रिय झाला. इंस्टाग्राम रील्स बनवणाऱ्या कंटेंट क्रिएटर्सनीही या चित्रपटातील गाणी आणि संवाद कॉपी केले आहेत. अल्लू अर्जुनच्या अभिनयाचे लहान मुलांनाही वेड लागले. त्यातलाच आणखी एक व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे.

लहान मुलाने फिल्मी स्टाइलने जिंकले मन

एका लहान मुलाने हृदयस्पर्शी असा अभिनय केला आहे. अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा, पुष्पराज, मैं झुकेगा नहीं…’ हा लोकप्रिय संवाद या लहान मुलाने त्याच्याच शैलीत कॉपी केला. व्हिडीओ पाहून तुम्ही समजू शकता की एका व्यक्तीने त्या मुलाला अल्लू अर्जुनसारखे अभिनय करण्यास सांगितले. मुलाने साऊथ स्टार म्हणूनही अतिशय फिल्मी स्टाईलमध्ये अभिनय केला. शेजारी उभी असलेली इतर मुलंही त्याचा हा गोड अभिनय पाहून हसू लागली. काही सेकंदांचा हा व्हिडीओ लाखो लोकांनी लाइक केला आहे.

अल्लू अर्जुनप्रमाणेच मुलानेही उत्तम अभिनय केला

इंस्टाग्रामवर hitesh_nayak.99 नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ अपलोड होताच लोकांना तो खूप आवडला. हा व्हिडीओ ३४ लाख लोकांनी लाइक केला आहे, तर एक कोटीहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. इतर अनेक वापरकर्त्यांनी देखील या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिली. एका यूजरने लिहिले की, ‘पुष्पाच्या बालपणीची भूमिका करण्यासाठी दिग्दर्शकाशी बोलले पाहिजे.’

Story img Loader