SDM Jyoti Maurya Case : एसडीएम ज्योती मौर्य आणि त्यांचे पती आलोक मौर्य यांच्यात सुरु असलेल्या वादाच्या दरम्यान मनिष दुबे आणि ज्योती मौर्य यांच्याविषयी नवी माहिती समोर आली आहे. ज्योती मौर्य यांचे पती आलोक मौर्य यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात हा उल्लेख केला आहे की मनिष दुबे आणि माझी पत्नी ज्योती मौर्य यांच्यात प्रेमसंबंध आहेत. तसचं मनिषचे इतर महिलांशीही प्रेमसंबंध आहेत असा आरोप केला आहे.
आलोक यांनी आणखी काय म्हटलं आहे?
आलोक मौर्य यांनी आपल्या पत्रात असाही उल्लेख केला आहे की मनिष दुबे आणि ज्योती यांचे कॉल रेकॉर्ड काढले जावेत. त्यांच्या कॉल रेकॉर्ड पाहिले तर लक्षात येईल की हे दोघं रोज १५ तास बोलायचे आणि १०० कॉल तरी करायचे. आलोक यांनी हे पण म्हटलं आहे की मनिष दुबेच्या सीयूजी नंबरचं व्हॉट्स अॅप चॅटिंग समोर आणलं तर तुम्हाला माझ्या हत्येचा कट कसा रचला जात होता आणि हे दोघं अश्लील गप्पा कशा मारत होते समोर येईल असंही म्हटलं आहे. माझ्याकडे या व्हॉट्स अॅप चॅटिंगचे काही स्क्रिन शॉट्स आणि कॉल डिटेल्स आहेत. माझी हत्या करुन माझ्या मुलांचं भविष्य बिघडवण्याचा कट या दोघांनी आखला होता असाही आरोप आलोक मौर्य यांनी केला आहे. आज तकने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
ज्योती आणि मनिष दुबेचे कॉल चेक केले
आलोक कुमार मौर्य यांनी म्हटलं आहे की मला जेव्हा ज्योती आणि मनिष दुबे यांच्या अफेअर बाबत समजलं तेव्हा मी ज्योतीचे कॉल डिटेल्स आणि व्हॉट्स अॅप चेक केलं. त्यावेळी मला त्यांचं कॉलिंग, चॅट आणि व्हिडीओ कॉल्स याविषयी समजलं या दोघांमध्ये कामाच्या दरम्यानही व्हिडीओ कॉलने चर्चा झाल्याचा आरोप आलोक मौर्य यांनी केला आहे.