बाळ जसजसे मोठे होत जाते तस तसे आई वडील त्याचा आवाज ऐकण्यासाठी उत्सुक होतात. मुलाचे बोबडे बोल त्यांना एक वेगळाच आनंद देताट. बाळाचे पहिले शब्द काय असावेत अशी तुमची अपेक्षा आहे? आई किंवा बाबा… बरोबर? पण एका विचित्र घटनेत एका आईने तिच्या बाळाचं पहिले शब्द ऐकले तेव्हा ती थक्क झाली. हा क्षण तिने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल. हा व्हिडीओ एकदा पाहाच.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ नऊ महिन्याच्या बाळाचा आहे. तरुण वयातील पालक २२ वर्षीय कारमेन बिश आणि २६ वर्षीय केरेन पार्सन्स यांचा हा नऊ महिन्याचा मुलगा आहे. लहान बाळ त्यांच्या तोंडून सुरूवातीला मम्मी, पप्पा असे उद्गार काढताना तुम्ही पाहिलं असेल. पण या नऊ महिन्याच्या बाळाने सर्वात आधी जे शब्द म्हटलंय ते ऐकून फक्त पालकंच नव्हे तर तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल. कारण या बाळाने सगळ्यात आधीचे शब्द काढताना ‘ऑल राईट ब्रुव’ असं म्हटलंय. तुम्हाला कदाचित यावर विश्वास करणं थोडं अवघड जाईल. पण हे खरंय. इवल्याश्या बाळाने सगळ्यात ‘ऑल राईट ब्रुव’ असं म्हटलेलं पाहून पालकांना मोठा आश्चर्याचा धक्का बसलाय. हा व्हिडीओ एकदा पाहाच.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : कतरिना कैफच्या ‘चिकनी चमेली’ गाण्यावर दिल्लीतील तरुणीचा जबरदस्त डान्स
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ:
आणकी वाचा : VIRAL VIDEO : किती गोड! बाप लेकीच्या डान्सचा हा व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल, १ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज
या बाळाच्या पालकांनी बाळाचे आश्चर्यचिक करणारे हे पहिले शब्द त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले आहेत. कारमेनच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. बघता बघता हा व्हिडीओ सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखा पसरू लागाला आहे. “ऑल राईट ब्रुव हे शब्द ऐकण्यासाठी आम्ही आठ महिने वाट पाहिली.” अशी कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय.
“बोडे, केरेन आणि मी नुकतंच एकत्र बसलो होतो. तो त्याच्या टेबलवर गप्पा मारत होता म्हणून मी माझा मोबाईल कॅमेरा बाहेर काढला आणि ते शूट केलं, त्यावेळा बाळाने जे शब्द म्हटलेत ते ऐकूण कॅमेन आश्चर्यचिकत झाला.”, असं देखील तिने या कॅप्शनमध्ये सांगितलंय.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : हातात आईचा फोटो… डोळ्यात अश्रू! या पाकिस्तानी नववधूची एन्ट्री पाहून तुम्ही भावूक व्हाल…
सुरूवातीला बाळाचे पहिले शब्द पालकांच्या लक्षात आले नाहीत. जेव्हा ते त्यांच्या आई-वडिलांना हा व्हिडीओ दाखवत होते, त्यावेळी व्हिडीओ बघता बघता बाळाचे पहिले शब्द ऐकू आले. म्हणून त्यांनी हा व्हिडीओ पुन्हा एकदा पाहिला तेव्हा सारेचजण हसू लागले. सर्वांना यावर विश्वासच बसत नव्हता. कारण ते शब्द होते “ऑल राईट ब्रुव”.
आणखी वाचा :
तिने शनिवारी TikTok वर हा व्हिडीओ अपलोड केला होता. सोमवारी केरेन नेहमीप्रमाणे कामावर गेला आणि त्याच्या कामाच्या सहकाऱ्यांकडू त्याला कळालं की त्याच्या या व्हिडीओला 50k व्ह्यूज मिळाले होते. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना खूपच आवडला आहे.