सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ अवाक् करणारे असतात. सध्या असाच एक पुण्यातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक पुणेरी काका बस पाठीमागे असताना सुद्धा रस्त्याच्या मधोमध चालताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून काही लोकांना हसू आवरणार नाही तर काही लोकं संताप व्यक्त करतील. व्हिडीओ पाहून काही लोकं ‘पुणे तिथे काय उणे!’ असे अलगद म्हणतील. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
पुणे हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक शहर आहे. येथील ऐतिहासिक वास्तू, परंपरा, इतिहास, संस्कृती, शिक्षण, खाद्यपदार्थ, पुणेरी पाट्या नेहमीच चर्चेचा विषय असतो. सोशल मीडियावर पुण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल की हे पुण्यातच घडू शकते.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक काका रस्त्यानी चालताना दिसत आहे. अचानक त्यांच्या मागून बस येते तरीसुद्धा ते बाजूला होत नाही आणि रस्त्याच्या मधोमध चालताना दिसतात. पुढे बस थांबते आणि बसमधील प्रवासी खाली उतरतात. त्यानंतर पुन्हा बस पुढे येते तरीसुद्धा काका अगदी मधोमध चालताना दिसतात. या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुणेरी काका” काकांचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पुण्यातील शनिवाडाजवळचा आहे. व्हिडीओ पाहून काही लोकांना हसू आवरणार नाही.
ek_puneri या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुणेरी काका” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हे पुणेकरच करू शकतात” तर एका युजरने लिहिलेय, “आम्ही पुणेरी” आणखी एका युजरने लिहिलेय, “असे कधीही करू नये” अनेक युजर्सनी या वर हसण्याचे इमोजी शेअर केलेले आहेत. पुण्याचे लोकं खूप हट्टी असतात असा अनेकांचा समज आहे. त्यामुळे असे काही पुण्यातच घडू शकते, असे अनेकांना वाटू शकते..