Taj Mahal Replica Built: शाहजहानने आपली पत्नी मुमताजच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून बांधलेल्या ताजमहालाला जगातील सातवे आश्चर्य मानले जाते. आता एका मुलाने चक्क आईच्या स्मरणार्थ कोट्यावधी रुपये खर्च करून ताजमहालची प्रतिकृती बनवली आहे. तामिळनाडूतील तिरुवरूर जिल्ह्यात अमरुद्दीन शेख दाऊद नावाच्या व्यक्तीने आपल्या आईच्या स्मरणार्थ ताजमहालाची प्रतिकृती तयार केलेली आहे. ही प्रतिकृती सुद्धा इतकी हुबेहूब आहे की ती पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. २०२० मध्ये आजारपणामुळे अमरुदिन यांच्या आईचे (जेलानी बीवी) निधन झाले होते.

अमरुद्दीनच्या मते, त्यांची आई ही शक्ती आणि प्रेमाचे प्रतीक होती. १९८९ मध्ये एका कार अपघातात वडील गमावल्यानंतर त्यांच्या आईनेच पाच मुलांचे संगोपन केले होते. ३० व्या वर्षापासून अमरुद्दीनच्या आईने एकटीने सगळं सांभाळलं होतं.

Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
Allu Arjun
‘पुष्पा’साठी राष्ट्रीय पुरस्कार घेताना अल्लू अर्जुन दु:खी का होता? स्वत: सांगितलं कारण
vicky kaushal in parshuram role
‘छावा’नंतर भगवान परशुरामाची भूमिका साकारणार विकी कौशल; सिनेमाचे पहिले पोस्टर आणि जबरदस्त लूक आला समोर
Mallikarjun kharge
Acharya Pramod Krishnam : “खरे हिंदू…”, मल्लिकार्जुन खरगेंवर काँग्रेसच्या माजी नेत्याचीच टीका!
isha deol reveal dharmendra did not like short dress for daughters
“वडील घरी आल्यावर आम्ही सलवार कुर्ता घालायचो”, ईशा देओलने धर्मेंद्र यांच्याबद्दल केलेला खुलासा; म्हणालेली, “त्यांना मी १८ व्या वर्षी…”
Two brothers from the village farmed saffron together Earn lakhs of rupees
Success Story: खेड्यातील दोन भावांनी मिळून केली केशरची शेती; वर्षाला कमावतात लाखो रुपये

अमरुद्दीन म्हणाले, ‘माझ्या आईने, वडील गमावल्यानंतर पुन्हा लग्न न करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मी आणि माझ्या बहिणी खूप लहान होतो. माझ्या आईने आमच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी खूप संघर्ष केला. ती आमचा कणा होती आणि तिनेच आमच्या वडिलांची भूमिकाही केली. ती गेली यावर माझा विश्वासच बसत नव्हता, मला अजूनही वाटत होतं की ती आमच्याबरोबर आहे आणि ती कायम आमच्याबरोबर असावी. तिरुवरूरमध्ये आमची काही जमीन होती आणि मी माझ्या कुटुंबाला सांगितले की मला सामान्य स्मशानाऐवजी माझ्या जमिनीवर आईचे दफन करायचे आहे.

अमरुद्दीन म्हणाले, ‘मी त्यांना सांगितले की माझी कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी मला तिचे स्मारक बांधायचे आहे. मला असे वाटते की, प्रत्येक मुलाला सांगावे की त्यांचे आई-वडील अनमोल आहेत, आजकाल आई-वडील आणि मुलं वेगळे राहतात. काही मुले त्यांच्या वृद्ध आई-वडिलांकडे लक्षही देत ​​नाहीत. हे बरोबर नाही. अमरुद्दीन यांनी ‘ड्रीम बिल्डर्स’शी संपर्क साधला ज्यांनी त्यांना प्रसिद्ध ताजमहालची प्रतिकृती तयार करण्याचे सुचवले.

३ जून २०२१ रोजी ताजमहाल सदृश इमारतीचे बांधकाम सुरू झाले. एक एकर जागेवर ८००० स्क्वेअर फूटमध्ये ताजमहालची प्रतिकृती तयार करण्यासाठी २०० हून अधिक लोकांनी दोन वर्षे काम केले. व सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च करण्यात आले.

माझ्या आईने ५-६ कोटी रुपये मागे ठेवले होते, मला ते पैसे नको होते आणि मी माझ्या बहिणींना सांगितले की त्या पैशातून मला आमच्या आईसाठी काहीतरी करायचे आहे. आता जमीन आणि इमारत एका चॅरिटेबल ट्रस्टला दिली आहे. त्याच्या आईच्या स्मारकाबरोबरच मुस्लिम बांधवांसाठी प्रार्थना करण्यासाठी एक जागाही इमारत परिसरात बांधण्यात आली आहे. या इमारतीत मदरशाचे वर्गही सुरू आहेत. लवकरच सर्वांना जेवण उपलब्ध करून देण्याची त्यांची योजना आहे. अमरुद्दीन यांनी सांगितले की, धर्म, जात असा भेदभाव न करता कोणीही इमारतीत येऊ शकतो.

हे ही वाचा<< महिलांना मोफत बससेवा जाहीर! काँग्रेस महिला आमदार बस चालवून शुभारंभ करायला गेल्या, ‘असं’ केलं लाखोंचं नुकसान

दरम्यान, काहींनी या संकल्पनेवर टीका करत हे पैसे तुम्ही गरिबांना देऊ शकला असता असे म्हटले होते. यावर उत्तर देताना अमरुद्दीन म्हणाले की,”मला दाखवायचे होते की माझी आई माझ्यासाठी सर्वस्व आहे, तिने आमच्यासाठी काय केले याच्या तुलनेत दुसरे काहीही महत्त्वाचे नाही.”