टॅटू कलाकाराची अविश्वसनीय निर्मिती दाखवणाऱ्या एका व्हिडीओने लोकांना आश्चर्यचकित केले आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक दोन नाही तर तब्बल ७६ टॅटू दिसतील. व्हिडीओमध्ये कलाकार फिल बर्गे यांची निर्मिती दाखवली आहे.
“बेट्टी बूप स्नो व्हाईटमधला सीन साध्य करण्यासाठी मी एकूण ७६ टॅटू केले. फ्लीशर स्टुडिओने १९३३ मध्ये रोटोस्कोप तंत्राचा वापर करून सेंट जेम्स इन्फर्मरी गाण्यावर कॅब कॅलोवे नृत्य पुन्हा तयार केले. या प्रकल्पासाठी आलेल्या आणि गोंदवलेल्या सर्वांचे खूप खूप आभार, ”त्यांनी व्हिडीओ शेअर करताना लिहिले.
व्हिडीओ पोस्ट केल्यापासून, ७३,८८0 हून अधिक लोकांनी पसंती दर्शवली आहे तर २.२ दशलक्ष लोकांनी व्हिडीओ बघितला आहे. व्हिडीओवर असंख्य कमेंट्स केल्या आहेत. “किती हुशार प्रोजेक्ट, आश्चर्यकारक काम!” एका इन्स्टाग्राम वापरकर्त्याने लिहिले. “सुंदर” दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली. “आश्चर्यकारक” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहले.
अवघ्या काही सेकंदात एकाच वेळी चीनमधल्या १५ इमारती झाल्या जमीनदोस्त; पाहा व्हायरल व्हिडीओ
या व्हायरल व्हिडीओबद्दल तुमचे काय मत आहे?