जगात टॅलेंटची कमी नाय, असं म्हणतात, हे खरंच आहे. काही माणसांमध्ये कौशल्यांची खाणच असते. अशा माणसांचं टॅलेंट पाहून अनेकांच्या भुवया उंचावतात. एका तरुणीचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या तरुणीने केलेल्या नेमबाजीनं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. आता या व्हिडीओमध्ये काय खास आहे, असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. मग या प्रश्नाचं उत्तर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्की मिळेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Uttar Pradesh Crime: आजमगड हादरलं! लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे विहिरीत फेकले अन्…

खरंतर, ही तरुणी हाताने नाही तर चक्क पायाने नेमबाजी करत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. एव्हढच नाही, तर तिचा निशाणाही अचूक आहे. या तरुणीचा हा जबरदस्त टॅलेंट पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. व्हिडीओमध्ये ही तरुणी एका लोखंडी रॉडवर हातांच्या जोरावर उभी राहते. तिने पायात धनुष्य पकडलं आहे. विशेष म्हणजे ही तरुणी पायाच्या मदतीनेच बाणाला धनुष्यात अडकवते आणि त्यानंतर एकदम अचूक निशाणा लावते. हा व्हिडीओ पाहिल्यांनंतर तुम्हीही या तरुणीच्या कौशल्य गुणांचे चाहते व्हाल.

येथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या इन्स्टाग्रामवर artinstic नावाच्या युजरने शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास १३ हजार लोकांनी लाईक केलं आहे. तर अनेक जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने कमेटं करत म्हटलं, हे तर खरंच अद्भुत आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटलं, जे काम मी हाताने करु शकत नाही, ते काम ही तरुणी तिच्या पायाने करते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amazing archery shot by the girl using her legs netizens shocked after watching viral video nss