अजूनही सोशल मीडियावर ‘कच्चा बादाम’ हे बंगाली गाणे धुमाकूळ घालत आहे. या गाण्यावर अनेक रील्स बनत असून सेलिब्रिटीजनाही या गाण्याने भुरळ घातली आहे. इंस्टाग्रामपासून विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक लोक या गाण्यावर डान्स करत व्हिडीओ पोस्ट करत आहेत. दरम्यान, या ट्रेंडमध्ये खेळाडूही मागे राहिलेले नाही. बॅटमिंटन पटू पीव्ही सिंधूने नुकतच या गाण्यावर रील बनवलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या कच्चा बदाम हे गाणे सोशल मीडियावर ट्रेंडिंग असल्याचे दिसत आहे. अनेक कलाकार या गाण्यावर डान्स करतानाचे व्हिडीओ शेअर करताना दिसतात. अशातच पीव्ही सिंधूने या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. तिने हे रील बनवताना सुंदर पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.

(हे ही वाचा: महाकाय अजगराचा रस्ता ओलांडतानाचा Video Viral; नेटीझन्स म्हणतात असे दृश्य कधीच पहिले नाही)

(हे ही वाचा: Video: स्मृती मानधनाचा ‘हा’ SIX एकदा बघाच; पाकिस्तानी खेळाडूची प्रतिक्रिया Viral)

सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग असणारे ‘कच्चा बादाम’ हे गाणं गाणारा व्यक्ती कोणताही प्रख्यात गायक नसून रस्त्यावर शेंगदाणे विकणारा सामान्य माणूस आहे. यांचे नाव भुबन बड्याकर असे आहे. पश्चिम बंगालच्या बीरभूमी जिल्ह्यात भुबन हातगाडी घेऊन ठिक-ठिकाणी जाऊन शेंगदाणे विकतात. त्याचवेळी कोणीतरी, भुबन यांचा अनोख्या शैलीत गातानाचा व्हिडीओ शूट केला. इंटरनेटवर हा व्हिडीओ अपलोड होताच हे गाणे प्रचंड व्हायरल झाले. यानंतर लोकांनी या गाण्यावर डान्स व्हिडिओ बनवून भुबनला रातोरात प्रसिद्ध केले. त्यांचे या गाण्याने आयुष्यच बदलून टाकले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amazing dance of pv sindhu on kaccha badamn song video viral ttg