महाराष्ट्राला इतिहास, लोककला आणि परंपरांचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. भावी पिढ्यांनी या वारशाचे कौतुक करणे आणि ते समजून घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या लोककला आणि संस्कृतीचे जतन करण्यासाठी, आज त्यांचे संगोपन आणि प्रचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने, पाश्चात्य प्रभाव असलेल्या सार्वजनिक ठिकाणी, या पारंपारिक कलांचे जतन करण्यास फार कमी लोक प्राधान्य देतात. पण काही लोक ही कला, ही संस्कृती जपण्याचा आणि महाराष्ट्राचा इतिहास भावी पिढ्यांना सांगण्याचा प्रयत्न करताना दिसतात. सध्या लोककला सादर करणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण आणि तरुणी यांनी वाघ्या मुरळीचा पेहराव केला आहे आणि लोकनृत्य सादर केले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे वाघ्या-मुरळी हे खंडोबाचे उपासक आणि त्यांच्याद्वारे केले जाणारे लोकनृत्य आहे. महाराष्ट्रात हे नृत्य खूप प्रसिद्ध आहे.

वाघ्या-मुरळी हे खंडोबाचे उपासक आहेत आणि त्यांच्याद्वारे केले जाणारे लोकनृत्य आहे. महाराष्ट्रात हे नृत्य खूप प्रसिद्ध आहे. खंडेरायाचे हे भक्त देवापुढे जागरण करून खंडोबाची लीला वर्णन करतात. महाराष्ट्राची ही लोककला आता लोप पावत चालली आहे. लोककलेचा वारसा जपणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तरुणीने पारंपारिक पद्धतीची नऊवारी नेसली आहे. गळ्यात पारंपारिक दागिने आणि कपाळावर लाल चंद्रकोर लावलेले दिसत आहे. तरुणाने वाघ्यासारखा पांढरा झबा आणि सलवार परिधान केली आहे. डोक्यावर लाल पागोटे परिधान केले आहे जे पिवळ्या कापडाने बांधलेले आहे. त्याच्या खांद्यावर व्याघ्रचर्मासारखे दिसणारे कापड बांधले आहे. कंबरेला पिवळ्या कापडाने घट्ट बांधले आहे. भंडारा उधळत दोघेही येळकोट येळकोट येळकोट जय मल्हार सुंदर नृत्य सादर केला आहे . गाण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्याचे आणि साहसाचे कौतुक केले आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावरील नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. व्हिडीओमध्ये एकाने कमेंट केली आहे की, फक्त तुमच्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता जागृत राहते.”

दुसऱ्याने कमेंट केली की, “उत्कृष्ट मराठी संस्कृती जपणारे नृत्य होते हे”

तिसऱ्याने कमेंट केली की, नृत्य करताना तुमचे हावभाव आणि तुमची ऊर्जा अप्रतिम होती.”

चौथ्याने कमेंट केली ,”अगदी ऊर्जा देणारं मराठ मोळ नृत्य आहे, खूप छान ..जय शिवराय”

पाचव्याने लिहिले की, “नृत्य पाहून अंगावर काटाच आला”

काहींनी “मल्हारी मार्तंड शिव मल्हार..” असा जयघोष केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amazing dance performed as vaghya muli on yelkot yelkot jai malhar song every marathi person will feel a thorn in their side after watching the viral video snk