सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. शिवाय व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये जुगाडू व्हिडीओंचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. यामध्ये कधी कोणी कारला हेलिकॉप्टर बनवतो, तर कधी कुणी विटांपासून कुलर बनवतो. सध्या अशाच एका नव्या आणि भन्नाट जुगाडाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून सगळेच थक्क झाले आहेत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीनेअसे काही केले आहे, जे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. हो कारण त्याने चार बॅटरी आणि मोटारच्या मदतीने एका स्प्लेंडर मोटरसायकलचे इलेक्ट्रिक बाइकमध्ये रूपांतर केल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर नेमकं या व्यक्तीने काय जुगाड केला आहे ते पाहूया.
हेही पाहा- PhonePe च्या ‘साउंड बॉक्स’ला बनवलं म्युझिक स्पीकर, तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी झाले थक्क, म्हणाले…
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस स्प्लेंडर बाईकच्या इलेक्ट्रिक व्हर्जनसोबत उभा आहे. ४ बॅटरी आणि मोटरच्या मदतीने पेट्रोलवर चालणाऱ्या स्प्लेंडरला इलेक्ट्रिक बाईकमध्ये कसं रूपांतरित केलं आहे व्हिडिओमध्ये दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी या जुगाडाचं कौतुक केलं आहे. कारण या व्यक्तीच्या जुगाडामुळे बाईक चालवण्यासाठी महागड्या पेट्रोलची गरज भासणार नाही, असं नेटकरी म्हणत आहेत.
या अप्रतिम जुगाडाचा व्हिडिओ punjab_vibe_1313 नावाच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत २ लाख ८० हजारांहून अधिक लोकांच्या लाईक्स मिळाले आहेत. शिवाय हे जुगाड बनवणाऱ्या व्यक्तीचे लोक तोंडभरुन कौतुक करत आहेत. तर काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे, “पेट्रोल वाचवण्याची अप्रतिम आयडीया” तर दुसऱ्याने लिहिले, “ही इलेक्ट्रीक नव्हे जनरेटर बाईक बनली आहे.”