सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ आपणाला हसवणारे असतात तर काही थक्क करणारे असतात. तर कधीकधी असेल व्हिडीओ व्हायरल होतात जे पाहिल्यानंतर आपणाला प्राण्यांच्या बुद्धीचे आणि युक्तीचे आपणाला कौतुक वाटते. सध्या असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक हत्तीचा कळप जंगलात आपल्या पिल्लांचे शिकारीपासून रक्षण करण्यासाठी असं काही करत आहेत, जे पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हत्तींनी आपल्या पिल्लाचे रक्षण करण्यासाठी अनोखी युक्ती वापरल्याचा व्हिडीओ IFS अधिकारी सुसंता नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हत्ती आपल्या पिलांची खूप काळजी घेणारे प्राणी म्हणून ओळखले जातात. सोशल मीडियावर हत्तींशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, ज्यामध्ये ते आपल्या पिल्लांची काळजी कशाप्रकारे घेतात हे आपण पाहिलं आहे.

हेही पाहा- लंच ब्रेकला चादर घेऊन गाढ झोपतात कर्मचारी,हर्ष गोयंकांनी शेअर केला व्हिडीओ,यूजर्स म्हणाले, ‘हे कोणतं ऑफिस’

IFS अधिकारी सुसंता नंदा यांनी असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे जो पाहिल्यानंतर अनेकांनी हत्तींनी पिल्लांची काळजी घेण्यासाठी केलेल्या कृत्याचं कौतुक केल आहे. हा कारण व्हायरल व्हिडिओमध्ये, दोन सिंह हत्तींच्या कळपाच्या आसपास लपून बसलेले दिसताच, हत्ती सावधपणे लहान पिल्लांचे रक्षण करण्यासाठी लगेच पिलांच्या चारीबाजूला एक वर्तुळ बनवताताना दिसत आहेत. शिवाय ते या पद्धतीने वर्तुळ बनवतात की पिल्ले आत सुखरुप राहू शकतात.

व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “सिंहाला पाहताच हत्ती लहान पिल्लांभोवती एक वर्तुळ बनवतात आणि त्यांचे रक्षण करतात. जंगलामध्ये हत्तींच्या कळपापेक्षा चांगले काम इतर कोणतेही प्राणी करत नाहीत.” हत्तींच्या या अनोख्या युक्तीचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो आतापर्यंत एक लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर अनेकजण त्यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत. कळपातील हत्तींचे ऐक्य पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. तर अनेकांनी कितीही मोठ्या प्राण्याला घाबरवण्यासाठी किती हत्ती पुरेसे आहेत अशा कमेंट केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amazing trick used by herd of elephants to protect their cubs video shared by ifs officer will amaze you jap