Divorce Party Viral Video : भारतीय संस्कृतीत लग्न या गोष्टीला विशेष महत्त्व आहे, पण लग्नानंतर पती-पत्नीचे नाते टिकवणे ही दोघांची जबाबदारी असते. पण, आपल्याकडे लग्न टिकवणे ही केवळ पत्नीचीच जबाबदारी मानली जाते. लग्न ही आयुष्यातील खास गोष्ट असली तरी अनेकदा लग्नानंतर नाते बिघडते. अनेकदा कुटुंब, मुलं यांच्यासाठी तडजोड करून नाते टिकवले जाते, पण याचा दोषही स्त्रीलाच दिला जातो. अशावेळी अनेकदा पती-पत्नी घटस्फोटाचा निर्णय घेतात. घटस्फोट ही कोणाच्याही आयुष्यात वाईट घटना असते. पण, एका महिलेने ही वाईट घटना आपल्यासाठी सर्वात आनंदी असल्याचे मानत घटस्फोटानंतर चक्क मित्र-मैत्रिणींसाठी जंगी पार्टीचे आयोजन केले. याच पार्टीतील तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात ही महिला बॉलीवूडच्या गाण्यांवर चक्क नाचतेय.
तुम्ही Divorce Party कधी पाहिली आहे का?
तुम्ही आजपर्यंत अनेक प्रकारच्या पार्ट्यांमध्ये गेला असाल. कधी कुणाची वाढदिवसाची पार्टी तर कुणाच्या लग्नाच्या पार्टीत… काही वेळा तुम्हाला मित्राच्या लग्नाला एक वर्ष झालं म्हणून दिलेल्या पार्टीतही गेला असाल. पण, आजवर तुम्ही कधी घटस्फोट पार्टीत हजेरी लावली आहे का? नसेल, तर सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहाच.
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला बॉलीवूडच्या वेगवेगळ्या गाण्यांवर डान्स करताना दिसत आहे. या महिलेच्या मागे असलेल्या भिंतीकडे पाहिल्यावर तुम्हाला लक्षात येईल की, ती कोणत्या बर्थ डे किंवा साखरपुड्याच्या पार्टीत नाचत नाही, तर स्वत:च्याच घटस्फोटाच्या पार्टीत मनसोक्त नाचतेय. कारण मागे भिंतीवर ‘Divorce मुबारक’ असे लिहिलेले दिसतेय.
घटस्फोट ही आनंदाची घटना नाही, पण यानंतर स्त्रीने दु:खी राहिलं पाहिजे अशी समाजाची एक मानसिकता असते. पण, या महिलेने घटस्फोट घेतल्यानंतर आनंदी रहायचं आणि हा आनंद जाहीरपणे साजरा करायचं ठरवलं. यासाठी तिने खास घटस्फोट पार्टी (Divorce Party) ठेवली आणि त्यासाठी कुटुंबातील सदस्यांना आणि मित्रपरिवाराला आमंत्रित केलं. या पार्टीसाठी तिनं काळपट रंगाचा एक चकमकीत ड्रेस (Colorful Dress) घातला होता, तसेच सुंदर मेकअप, ज्वेलरी वेअर करत ती या पार्टीत नाचण्याचा आनंद घेत होती. यावेळी तिचे मित्र-मैत्रिणीदेखील चिअर करत होते. (woman organised a divorce party)
More Stories On Trending : घामेजलेलं अंग, अस्वच्छता अन् भाताच्या टोपावर ठेवला पाय; अयोध्येत समाजकार्याच्या नावाखाली किळसवाणा प्रकार; पाहा धक्कादायक VIDEO
हा व्हायरल व्हिडीओ @IM_HarisRaza नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये ‘तलाक मुबारक’ असे लिहिले आहे. आत्तापर्यंत सोशल मीडियावर अनेक वेळा लग्नसोहळ्याचे आणि इतर पार्ट्यांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, मात्र पहिल्यांदाच घटस्फोटाच्या पार्टीचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.