तुम्हाला अॅमेझॉन कंपनीचं’अॅलेक्सा’हे डिव्हाइस माहीत असेल. ALEXA हे अॅमेझॉनचं असं उपकरण आहे जे तुमच्याशी बोलतं. तुम्ही जी माहिती विचाराल ती गुगलवर शोधून तुम्हाला सांगतं. तुमच्या कामाची नोंद ठेवतं आणि वेळेवर आठवणही करून देतं. तुम्हाला हवी असलेली गाणी ऐकवतं. एखादा प्रश्न विचारलात तर त्याचं उत्तरही हे उपकरण देतं. हे तंत्रज्ञान माणसाच्या सोयीसाठी आहे, की गैरसोयीसाठी, असा प्रश्न एका आईला पडला आहे. याचं कारण म्हणजे ‘अॅलेक्सा’ने एका १० वर्षाच्या मुलाला सर्वात धोकादायक चॅलेंज सुचवल्याची धक्कादायक घटना घडलीय. सध्या सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा सुरूये. जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण ?
यूएसमध्ये राहणाऱ्या माऊलीची गत ‘हसावं की रडावं?’ अशी झाली आहे. कारण घरात स्वतःच्या सोयीसाठी घेतलेलं अलेक्सा हे उपकरण आपल्या मुलाच्या जीवाशी आल्याचं पाहून या आईला मोठा धक्का बसला आहे. घरातील सोयी-सुविधेसाठी घेतलेला अलेक्सा आपल्या मुलांच्या जीवासाठी धोकादायक ठरेल, असं तिला स्वप्नातही वाटलं नसेल. अलेक्साने अवघ्या १० वर्षाच्या मुलाला एक धोकादायक चॅलेंज सुचवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याचा एक स्क्रीनशॉट आईने सोशल मीडियावर शेअर केलाय. त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. या घटनेबाबत सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरूय.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : सासरी जाताना नवरीचा असा अवतार पाहून साऱ्यांना धक्का बसला, मग माहेरच्यांनी काय केलं ते पाहाच
इंटरनेटवर सध्या एका धोकादायक चॅलेंजची चर्चा सुरूय. या चॅलेंजचं नाव ‘आउटलेट चॅलेंज’ असं आहे. या चॅलेंजमध्ये फोन चार्जरला वॉल आउटलेटमध्ये अर्ध्यात प्लग इन केलं जातं आणि नंतर यात उघड्या प्रॉन्ग्सला एक नाणं लावून दाखवायचं असतं. परंतू या चॅलेंजमुळे जगभरात एकापाठोपाठ एक आगीच्या भयानक घटना घडत असल्याचं समोर येत आहे. या घटनेत अनेकांचे जीव देखील जाण्याची शक्यता आहे. परंतू या धोकादायक चॅलेंजची सर्वत्र जोरदार चर्चा सुरूये. अशा धोकादायक घटना घडत असताना सुद्धा लोक बिनधास्तपणे हे चॅलेंज स्वीकारत याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसून येत आहेत.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : काही वेळात मुखाग्नी देणार तितक्यात डोळे उघडले; सरणावरच आजोबा झाले जिवंत
आणखी वाचा : किती गोड! हत्तीच्या पिल्लाला बर्फात खेळताना पाहून नेटकरी म्हणाले सगळा ताण विसरलो, पाहा VIRAL VIDEO
अलेक्साने एका १० वर्षाच्या मुलाला हे धोकादायक चॅलेंज करण्याचं सुचवल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. यूएसमध्ये राहणाऱ्या क्रिस्टिन लिव्हडाहल या आईने Amazon Alexa अॅपवरील अॅक्टिव्हिटीचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यात अलेक्सा हे धोकादायक चॅलेंज सुचवत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. हे वॉल आउटलेट चॅलेंज मूळ Amazon चे नाही तर वेबवरून घेतलं गेलं आहे. तो ourcommunity.com या वेबसाइटवरून घेतला गेला आहे आणि हा लेख 2020 चा आहे.
indy100 च्या अहवालानुसार, Amazon ला या घटनेची माहिती देण्यात आली आणि यातील त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. Amazon Alexa, Google Assistant आणि Siri सोर्ससह इतर व्हर्च्युअल असिस्टंट्स हे वेबच्या आधारे उत्तरे देतात. परंतु ही सूचना भविष्यात धोकादायक कशी असू शकते, हे लक्षात घेता यात बदल करण्यात आलेले आहेत. परंतू तरीही या घटनेने सर्वांना मोठा धक्का बसला आहे.