Amazon delivered a pressure cooker after 2 years to the customer: प्रत्यक्षात मार्केटमध्ये जाऊन सामान खरेदी करण्याचे दिवस आता गेले. इंटरनेटची सुविधा आल्यापासून घरपोच डिलिव्हरी करणारे अनेक ॲप्स आता आपल्या हाताच्या बोटांवर उपलब्ध आहेत. इतकंच नव्हे तर आठवडाभर लागणारा डिलिव्हरी काळदेखील आता कमी झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता अगदी १५ मिनिटांपासून ते एका दिवसात तुमची ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचते. पण, या अपडेटेड जगात एका ग्राहकाची Amazon ऑर्डर चक्क दोन वर्षांनंतर आली. या व्यक्तीची पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल होतेय.

व्हायरल पोस्ट (Viral Post )

जय नावाच्या X (पूर्वीचे ट्विटर) युजरने दोन वर्षांपूर्वी Amazonवरून प्रेशर कुकर ऑर्डर केला होता. जयने नंतर ती ऑर्डर रद्द केली आणि त्याचा त्याला परतावादेखील (Refund) मिळाला. ऑर्डर रद्द करूनही आता तब्बल दोन वर्षांनंतर प्रेशर कुकरचं पॅकेज त्याच्या दारात पोहोचलं, यामुळे तो खूप गोंधळून गेला आणि याचं त्याला आश्चर्यही वाटलं.

व्हायरल झालेल्या पोस्टनुसार, युजरने प्रेशर कुकरची ऑर्डर १ ऑक्टोबर २०२२ रोजी दिली होती आणि त्याला दोन वर्षांनी २८ ऑगस्ट २०२४ रोजी ती ऑर्डर मिळाली. @thetrickytrade या एक्स अकाउंटवरून ही पोस्ट शेअर करण्यात आली असून “दोन वर्षांनंतर माझी ऑर्डर डिलिव्हर केल्याबद्दल Amazon चे आभार”, असं कॅप्शन या पोस्टला जयने दिलं आहे. “प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कूक खूश झाला, त्याला असं वाटलं की, हा एक खास प्रेशर कुकर असावा!” असंही युजरने पुढे लिहिलं.

हेही वाचा… VIRAL VIDEO: पोलीस चौकीसमोर ठाण मांडून बसला अन् मागून वेगवान ट्रकने दिली धडक, पुढे जे काही घडलं ते पाहून बसेल धक्का

Amazonची प्रतिक्रिया (Amazon Reply)

युजरची पोस्ट व्हायरल होताच नेटकऱ्यांनी ‘मार्सवरून डिलिव्हरी आली की काय’ अशी प्रतिक्रिया दिली. जयच्या या पोस्टवर खुद्द Amazonने रिप्लाय देत लिहिलं, “हॅलो, आम्हाला हे ऐकून वाईट वाटले. कृपया आमच्या सपोर्ट टीमला याची तक्रार करा.” या रिप्लायवर युजर म्हणाला की, “तक्रार काय देऊ? मी ऑर्डर रद्द केली होती आणि २०२२ मध्ये याचा परतावादेखील मला मिळाला होता आणि काल अचानक ही ऑर्डर माझ्या दारात आली, आता मी त्याचे पैसे कसे देऊ?”

हेही वाचा… VIDEO: ए हालो! गुजरातमध्ये पुरामुळे भरले पाणी पण उत्साह कमी झाला नाही, गुडघाभर पाण्यात कसा खेळला गरबा पाहाच

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

तर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, “यात काही पदार्थ बनवणार आहेस की म्युझियममध्ये ठेवण्याचा विचार आहे.” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “मला असं वाटतं की डिलिव्हरी बॉय युनिव्हर्सिटी सर्कलच्या ट्रॅफिकमध्ये अडकला असणार”, तर एकाने त्याच्याबरोबरदेखील असाच अनुभव घडल्याचे सांगितले. तो कमेंट करत म्हणाला, “माझ्याबरोबरही अशीच विचित्र गोष्ट घडली. मी जून २०२३ मध्ये एक ऑर्डर दिली होती, ती माझ्यापर्यंत पोहोचलीच नाही आणि याची तक्रार केल्यानंतर मला परतावा मिळाला, पण नंतर तीच ऑर्डर मला ऑक्टोबरमध्ये मिळाली.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amazon delivered a pressure cooker after 2 years to the customer man post viral on social media dvr