सोशल मीडियावर सध्या एका अॅमेझॉन डिलिव्हरी ड्रायव्हरने दरवाज्यासमोर पॅकेज लपवल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. खरंतर एका सुपरस्मार्ट बायकोनं नवऱ्यापासून आपण केलेली शॉपिंग लपवण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. तिच्या सूचनेचं पालन करताना होम डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या या डिलिव्हरी ड्रायव्हरची जी फजिती झाली ते पाहून तुम्हाला हसू आवरणं कठिण होईल. या डिलिव्हरी ड्रायव्हरची झालेली फजिती देखील पाहण्यासारखी आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचा मूड फ्रेश होईल हे मात्र नक्की.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका घराच्या दरवाज्यासमोर ठेवलेल्या एका पायपुसणीवर एक संदेश लिहिला होता. ‘नवऱ्यापासून पॅकेज लपवा’ असा आदेशच या पायपुसणीवर लिहिण्यात आलाय. त्यानंतर घरी एक अॅमेझॉनचा डिलिव्हरी ड्रायव्हर ऑर्डर केलेलं पार्सल घेऊन आलेला दिसून येतोय. दरवाज्यासमोर आल्यानंतर तो बेल सुद्धा वाजवताना दिसून येतोय. बेल वाजवल्यानंतर दरवाजा उघडायला देखील वेळ लागतो. त्या वेळेत हा डिलिव्हरी ड्रायव्हर इथे तिथे पाहत असताना अचानक त्याला दारासमोर असलेल्या पायपुसणीवर लिहिलेली सुचना दिसली. ही सूचना या डिलिव्हरी ड्रायव्हरला कळलेली असते. या सूचनेचं पालन करताना त्याची जी फजिती होते ते पाहून तुम्ही पोटभरून हसाल.

सुरूवातीला हा डिलिव्हरी ड्रायव्हर त्या सूचनेचा फोटो आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात काढतो. पायपुसणीवर लिहिलेल्या सूचनेनुसार तो हातातलं पॅकेज पायपुसणीच्या खालीच लपवतो. पॅकेज ज्या ठिकाणी ठेवलंय त्याचा पुन्हा एक फोटो आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात काढतो. पण पुढे जे घडतं ते खरंच मनोरंजक आहे. सुपरस्मार्ट बायकोने दिलेल्या सूचनेनुसार हा डिलिव्हरी ड्रायव्हर पायपुसणीखालीच पॅकेज लपवून तिथून जाणार तितक्यात दरवाजा उघडला जातो आणि समोर चक्क नवऱ्यालाच पाहून या डिलिव्हरी ड्रायव्हरची काही वेळासाठी गोंधळून जातो.

घरसमोर या उभा असलेल्या या व्यक्तीला पासून नवऱ्याने त्याच्याकडे विचारपुस केली. त्यावेळी या ड्रायव्हरने आपण स्वतः एक ख्रिस्ती धर्माचा प्रचारक असल्याचं सांगितलं. आपली चोरी पडकली जाते की काय असा विचार करताना या ड्रायव्हरच्या चेहऱ्यावरचे हावभाव मात्र पाहण्यासारखे होतात.

आणखी वाचा : शाळेतील शिक्षकाचा डान्स पाहून हॉलिवूड स्टारही थक्क, पाहा २ कोटी लोकांनी पाहिलेला VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : असा केक तुम्ही कधी पाहिला नसेल, पण नवरा नवरीच्या समोरच पडला त्यांचा स्पेशल Wedding Cake

हा मजेदार किस्सा दारावर लावेलल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून तो Tok Hype नावाच्या युट्यूब चॅनलवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ सध्या लोकांना इतका आवडलाय की आतापर्यंत या व्हिडीओला ३०.५ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. पॅकेज लपविण्यासाठी या ड्रायव्हरने केलेले प्रयत्न पाहून नेटिझन्स त्यांचं कौतुक करताना दिसून येत आहेत. तसंच ‘हाच डिलिव्हरी ड्रायव्हर मला माझ्या घरासाठी देखील हवाय’ अशा विनोदाने मागण्या करत या व्हिडीओ नेटकरी मंडळी वेगवेगळ्या कमेंट्स शेअर करत आहेत.

Story img Loader