तुम्ही कधी हजार रुपये मोजून नारळाच्या करवंट्या विकत घ्याल का? आता हे वाचून तुम्ही म्हणाल नारळाच्या करवंट्यांसाठी जिथे आम्ही साधे पाच-दहा रुपये मोजत नाही तिथे हजार रुपये का मोजायचे? पण तुम्हाला माहितीये ‘अॅमेझॉन इंडिया’ या इ कॉमर्स साइटवर नारळाच्या करवंट्या आणि त्यापासून तयार केलेल्या वस्तू चक्क ५०० ते १५०० हजार रुपयांना विकल्या जात आहेत. हे वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला ना?
एका अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून सुरूवातीला याचा एक फोटो शेअर केला. ज्यात नारळाच्या करंवटीपासून तयार केलेला कप चक्क तीन हजारांना विकला जात होता. या कपवर ५५ % सूट देऊन तो तब्बल १,३०० रुपयांना विकला जात असल्याची बाब या ट्विटर अकाऊंटवरून निदर्शनास आणून दिली. मग काय सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली. अॅमेझॉन इंडियावर नारळाच्या करवंटीपासून तयार केलेले असे एकच उत्पादन नाहीये तर अशा अनेक वस्तू आहेत. ज्यात वाट्या, चमचे यांचा समावेश आहे. या सर्व वस्तूंची किंमत ही चारशे ते हजार रुपयांच्या घरात आहेत.
Seriously? pic.twitter.com/btViUdhFbJ
— Rema Rajeshwari IPS (@rama_rajeswari) January 15, 2019
Hahahha….I can give them to whoever wants it for free…everyday!
— Me
I will be a crorepati soon. Found the trick .
— Anand Abhirup ଆନନ୍ଦ ଅଭିରୂପ୍ (@TheCrazy_Freak) January 15, 2019
anythings and everything can be sold online at these atrocious prices and we have smart customers buying the same
— Rama Venugopal (@ramavenu) January 15, 2019
It's all about marketing, ain't it? https://t.co/lcqLhSdQHW
— VIVEK (@ivivek_nambiar) January 15, 2019
Tell me it's na real. https://t.co/PLsO89LU5Y
— Mohak (@Mohacked) January 15, 2019
अॅमेझॉन इंडियावर नारळाच्या करवंट्यापासून तयार केलेल्या वस्तूंच्या किंमती या ४९९ पासून सुरू आहेत.
नारळाचं झाडं हे कल्पतरु मानलं जातं. या झाडाच्या प्रत्येक भागाचा उपयोग केला जातो. आजही अनेक खेडेगावात नारळाच्या करवंट्या फेकून न देता डाव, वाट्या, शर्टची बटणं तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. मात्र या वस्तू कधीही इतक्या चढ्या दरात विकल्या जात नाही त्यामुळे अॅमेझॉनवर नारळाच्या करवंट्यापासून विकल्या जाणाऱ्या या वस्तू पाहून अनेक ट्विटर युजर्सनं मजेशीर प्रतिक्रियेद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.