तुम्ही कधी हजार रुपये मोजून नारळाच्या करवंट्या विकत घ्याल का? आता हे वाचून तुम्ही म्हणाल नारळाच्या करवंट्यांसाठी जिथे आम्ही साधे पाच-दहा रुपये मोजत नाही तिथे हजार रुपये का मोजायचे? पण तुम्हाला माहितीये ‘अॅमेझॉन इंडिया’ या इ कॉमर्स साइटवर नारळाच्या करवंट्या आणि त्यापासून तयार केलेल्या वस्तू चक्क ५०० ते १५०० हजार रुपयांना विकल्या जात आहेत. हे वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला ना?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एका अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून सुरूवातीला याचा एक फोटो शेअर केला. ज्यात नारळाच्या करंवटीपासून तयार केलेला कप चक्क तीन हजारांना विकला जात होता. या कपवर ५५ % सूट देऊन तो तब्बल १,३०० रुपयांना विकला जात असल्याची बाब या ट्विटर अकाऊंटवरून निदर्शनास आणून दिली. मग काय सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली. अॅमेझॉन इंडियावर नारळाच्या करवंटीपासून तयार केलेले असे एकच उत्पादन नाहीये तर अशा अनेक वस्तू आहेत. ज्यात वाट्या, चमचे यांचा समावेश आहे. या सर्व वस्तूंची किंमत ही चारशे  ते  हजार रुपयांच्या घरात आहेत.