दिवसेंदिवस ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा, वेबसीरिज पाहण्यासाठी सिनेचाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. सिनेमा पाहण्यासठी मल्टिप्लेक्समध्ये जाऊन महागडं तिकिट खरेदी करण्यात अनेक जण नापसंती दर्शवताना दिसत आहेत. कारण OTT वर अॅमेझॉन, नेटफ्लिक्स, डिज्नी प्लस हॉटस्टार यांसारखे माध्यम उपलब्ध झाल्यामुळं वाजवी दरात महिन्याचं सब्सक्रिप्शन मिळतं. त्यामुळं ओटीटीवर मनोरंजन करणारे शो पाहण्याचा प्रेक्षकांचा कल वाढला आहे. अशातच आता सिनेचाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
कारण जर तुम्ही Broadband Connection चा शोध घेत असाल, तर आता तुमची शोधमोहीम संपण्याची शक्यता आहे. कारण आता आम्ही तुम्हाला काही ब्रॉडबॅंड प्लान्सबाबत सांगणार आहोत. या प्लान्समुळं तु्म्हाला अनेक फायदे होणार आहेत. या नवीन प्लॅन्सनुसार OTT Benifits ही मिळणार आहेत. आता आम्ही तुम्हाला Airtel-Jio सह काही अन्य कंपन्यांच्या प्लान्सबाबत माहिती देणार आहोत. तर जाणून घेऊयात कोणती कंपनी कमी किंमतीत खूप फायदेशीर ठरू शकते.
Airtel 999 Broadband Plan
एअरटेलचा हा प्लान सर्वात जास्त फायदेशीर ठरू शकतो. जर तुम्ही इंटरनेटच्या अतिशय वेगवान सुविधेचा शोध घेत घेत आहेत, तर तुम्हाला या प्लानचा फायदा होऊ शकतो. कारण या प्लानमध्ये तु्म्हाला 200 Mbps पर्यंत सुपरफास्ट इंटरनेटची सुविधा मिळते. याचसोबत या प्लानची एक वेगळी खासीयत आहे. या प्लाननुसार तुम्हाला OTT Platform चं सब्सक्रिप्शनही मिळतं. Disney+Hotstar, Amazon Prime, Xstream Premium या ओटीटी प्लॅटफॉर्मचं सब्सक्रिप्शन तुम्हाला मोफत मिळणार आहे.
jio 999 Broadband Plan
jio 999 Broadband Plan मध्ये ग्राहकाला ३० दिवसांची मुदत मिळते. या प्लानमध्ये तुम्हाला 150 Mbps चा स्पीड मिळतो. याचसोबत तुम्हाला Unlimited Data ची सुविधाही दिली जाते. परंतु, तुम्हाला चांगलं OTT सब्सक्रिप्शनवालं प्लान हवं असेल, तर तुमच्यासाठी हा प्लान फायदेशीर ठरू शकतो. कारण यामध्ये Prime Video, Disney+Hotstar, Voot Select, Sony Liv, Zee5, Discovery+, ALT Balaji चं सब्सक्रिप्शन दिलं जातं.
Excitel Broadband Plans
Excitel Broadband तुमच्यासाठी चांगला विकल्प ठरू शकतो. Excitel 592 Broadband Plan सर्वात चांगलं विकल्प होऊ शकतो. या प्लानमध्ये तुम्हाला OTT Subscription मिळणार नाही. मात्र, तुम्हाला 200 Mbps च्या स्पीडची सुविधा नक्कीच मिळते. जर तु्म्ही 667 Broadband Plan घेत असाल तरीही तुमच्या हा चांगला विकप्ल ठरू शकतो. या प्लानमध्ये 300 mbps पर्यंत इंटरनेटचं स्पीड मिळतं.