Radhika Merchant Wears Sister Anjali’s Jewellery For Her Wedding With Anant Ambani : राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचा शाही विवाहसोहळा अखेर १२ जुलै रोजी पार पडला. अतिशय भव्य-दिव्य असा हा विवाहसोहळा होता. त्यामध्ये बॉलीवूडसह आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींपर्यंत सर्व जण उपस्थित होते. आता अनंत आणि राधिका यांच्या या शाही विवाहसोहळ्याचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात नववधू राधिकाचा वेडिंग लूक चांगलाच व्हायरल होतोय. राधिकाने लग्नात प्रसिद्ध डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाइन केलेला लाल आणि सफेट रंगाचा ब्रायडल आउटफिट परिधान केला होता. त्यात ती एखाद्या राजकुमारीप्रमाणे सुंदर दिसत होती. या आउटफिटवर तिने गळ्यात भरगच्च असे दागिने घातले होते; ज्यांची आता बरीच चर्चा सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राधिका मर्चंटच्या गळ्यातील दागिने बहिणीचे (Radhika Merchant Wedding Jewellery)

आता असे म्हटले जाते की, राधिकाने तिच्या लग्नाच्या दिवशी घातलेले दागिने तिची बहीण अंजली मर्चंटचे होते; जे अंजलीने तिच्या लग्नात वापरले होते. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, राधिकाने गळ्यात पोल्की कुंदन चोकर घातला होता; जो प्रत्यक्षात तिची बहीण अंजलीचा आहे. २०२० मध्ये राधिकाची बहीण अंजलीचे लग्न झाले, त्यावेळी तिने हाच नेकपीस गळ्यात घातला होता. एवढेच नाही, तर राधिकाचा मांगटिका, हातफूल व कानातले हे दागिनेही अंजलीचेच होते.

‘शेअरिंग इज केअरिंग’ यावर अंबानी कुटुंबीयांचा विश्वास आहे आणि आता राधिकाचाही त्यावर विश्वास आहे; जे तिने या कृतीतून पुन्हा एकदा सिद्ध केले, असे बोलले जाते.

More Stories On Ambani Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नात हार्दिक पंड्याने ‘या’ अभिनेत्रीसह दाखवल्या भारी डान्स मूव्ह्ज!

राधिकाने यापूर्वीही घातला होता तो चोकर नेकलेस  (Radhika Merchant Wedding)

पण, राधिकाने हा चोकर नेकलेस वापरण्याची ही पहिलीच वेळ नाही, अशाही काही बातम्या व्हायरल होत आहेत. याआधीही २०१८ मध्ये राधिकाने ईशा अंबानीच्या रिसेप्शनमध्ये याच मांगटिकासह हेच दागिने परिधान केले होते.

त्यावर प्रोड्युसर व स्टायलिस्ट रिया कपूरने यापूर्वी सांगितले होते की, राधिकाने तिची आई, आजी व बहीण यांचे दागिने वापरले होते. याच सर्व दागिन्यांनी या प्रत्येक जणी आपापल्या लग्नात नटल्या होत्या.

राधिकाने तिच्या लग्नात गुजराती शैलीचा लाल आणि पांढऱ्या रंगाचा भरजरी सुंदर लेहेंगा घातला होता. त्यानंतर पाठवणीच्या वेळी मनीष मल्होत्राने डिझाईन केलेला बनारसी डिझाइनचा लेहेंगा घातला होता; ज्यात ती खूपच सुंदर दिसत होती. राधिकाचे हे दोन्ही लूक आता सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

अनंतच्या लग्नासाठी केवळ राधिकाच नाही, तर संपूर्ण अंबानी कुटुंबाने अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाइन केलेले कपडे परिधान केले होते. (Anant Ambani-Radhika Merchant marriage)

त्यात राधिकाने भरजरी लेहेंग्याबरोबर डोक्यावर पाच मीटर लांबीचा पदर घेतला होता. राधिकाचा लेहेंगा डिझायनर्स स्टोन्स, सिक्वीन्स, कॉपर टिक्की व लाल रेशमने तयार करण्यात आला होता. त्यावर हाताने नक्षीदार फुलांच्या सुंदर डिझायन्स काढण्यात आल्या होत्या. एम्ब्रॉयडरी केलेल्या लाल शोल्डर दुपट्ट्याने तिचा हा फायनल गेटअप तयार करण्यात आला होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambani wedding jewellery ambani bahu rani radhika merchant wears sister anjalis jewellery for her wedding with anant ambani sjr