‘कौन बनेगा करोडपती’ या गाजलेल्या शोमध्ये खेळ जिंकून श्रीमंत झालेल्या अनेकांच्या कहाण्या तुम्ही आतापर्यंत पाहिल्या असतील. कोणाचं नशीब कधी आणि कसं बदलेल हे खरंच सांगता येत नाही. अनेकदा लोक एका रात्रीत करोडपती बनतात आणि काही लोक एका रात्रीतच रस्त्यावरही येतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा अॅम्ब्युलन्स ड्रायव्हरची कहाणी सांगतोय ज्याने कधी उभ्या आयुष्यात तो करोडपती होईल, याची कल्पना सुद्धा केली नव्हती. पण केवळ नशीबाच्या जोरावर हा अॅम्ब्युलन्स ड्रायव्हर रातोरात करोडपती झालाय. यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे खरंय.
पश्चिम बंगालच्या पूर्व बर्धमान जिल्ह्यात राहणारा अॅम्ब्युलन्स ड्रायव्हर शेख हीरा याने सकाळी उठून १ कोटी रुपयांचे जॅकपॉट लॉटरीचे तिकीट केवळ २७० रुपयांना खरेदी केलं. पण बघता बघता दुपारपर्यंत तो कोट्यधीश झाला होता. खरं तर, १ कोटींचा जॅकपॉट जिंकल्यानंतर तो इतका भारावून गेला होता की तो थेट पोलिस स्टेशनला सल्ला घेण्यासाठी गेला. लॉटरीचे तिकीट हरवण्याची भीतीही त्याच्या मनात होती. अखेर शक्तीगड पोलिसांनी त्याला सुखरूप घरी पोहोचवलं. आता त्याच्या घरी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
शेख हिरा यांची आई आजारी आहे. तिच्या उपचारासाठी त्याला पैशांची खूप गरज होती. पण नशीबाने अचानक दिलेल्या या सुखद धक्क्याने या सामान्य रुग्णवाहिका चालकाला खात्री आहे की आता त्याची आई लवकरच बरी होईल. “मी नेहमी एक दिवस जॅकपॉट जिंकण्याचं स्वप्न पाहायचो आणि तिकीट खरेदी करत राहिलो. शेवटी नशीब माझ्याकडे बघून हसलं,” असं प्रतिक्रिया देताना शेख म्हणाला.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : प्रेम असावं तर असं…! कोंबडीला घेऊन जाणाऱ्या माणसासोबतच भिडला कोंबडा! पुढे काय झालं ते पाहाच…
इतक्या साऱ्या पैशाचं काय करणार?, असं विचारल्यावर शेख म्हणाला की, तो एका निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे आणि त्याच्या आर्थिक समस्या दूर झाल्या आहेत. सध्या त्याला त्याच्या आईवर सर्वोत्तम उपचार करता येऊ लागले आहेत. त्याच्या आईसाठी आणि राहण्यासाठी एक चांगलं घरही ते बांधणार आहे. यापेक्षा जास्त काही विचार काही केलेला नाही, असं शेख म्हणाला.
भाग्यवान लॉटरीचे तिकीट विकणारे शेख हनीफ म्हणाले, “मी अनेक वर्षांपासून लॉटरीच्या तिकीटाचा व्यवसाय करत आहे. बरेच लोक माझ्या दुकानातून तिकिटे खरेदी करतात. काही बक्षिसे अधूनमधून मिळतात. पण असं जॅकपॉट बक्षीस माझ्या दुकानातून यापूर्वी कधीही आलं नव्हतं. आज मला खूप आनंद झाला की जॅकपॉट विजेत्याने माझ्या दुकानातून तिकीट खरेदी केलं आहे.”
आणखी वाचा : Sindoor On Groom: ऐकावं ते नवलंच! चक्क नवरीने नवरदेवाच्या भांगात भरलं सिंदूर…VIRAL VIDEO एकदा पाहाच
एका रूग्णवाहिका चालकासाठी १ कोटी रुपयांची रक्कम देखील कमी नाही. रातोरात कोट्यधीश होणारा रूग्णवाहिका चालकाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. मात्र, तरीही एवढी मोठी रक्कम मिळाल्यानं शेख आणि त्याचे संपूर्ण कुटुंब खूप आनंदी आहे. कारण, एक दिवस आपलं नशीब असं बदलेल याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. सोशल मीडियावर सध्या शेख हीराची बरीच चर्चा रंगलीय. एका रात्रीत तो करोडपती तर झालाच आहे पण सोबतच सोशल मीडियावर रातोरात सोशल मीडिया स्टार सुद्धा झालाय.