Amchya papani ganpati anla Video : दोन-तीन आठवड्यांपासून सगळ्यांच्या इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर एका चिमुकल्या मुलाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ते गाणं म्हणजे ‘आमच्या पप्पांनी गणपती आणलाय गणपती’ हे गाणं. या गोड गाण्यानं सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातलाय. लहाण म्हणून नका, वयस्कर मंडळी सगळेच या गाण्यावर रील्स बनवून अपलोड करताना दिसतायत. हा व्हायरल व्हिडिओ आहे साईराज केंद्र या चार वर्षाच्या चिमुकल्याचा. परळीतल्या या मुलाचा निरागस पणा सगळ्यांना वेड लावतोय. मात्र दरम्यान अशाच आणखी एका चिमुकल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
सध्या सर्वत्र वातावरण हे बाप्पामय झालं आहे. अशातच घरोघरी, मंडळात अगदी कानाकोपऱ्यात बघावं तिकडे गणरायाचं राज्य दिसतंय. अगदी सोशल मीडियावरही बाप्पामय झालं आहे. गणपती बाप्पा हे सगळ्यांचेच फेव्हरेट आहेत. अगदी लहान चिमुकल्यांपासून ते थोऱ्यामोठ्यांपर्यंत गणपती बाप्पावर सगळ्यांची श्रद्धा आहे. असाच एक चिमुकला गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आलं आणि काय झालं पाहा.
बाप्पासोबतचं निरागस नातं!
या व्हिडीओमधील चिमुकल्याचा निरागसपणा नेटकऱ्यांना प्रेमात पाडत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा चिमुकला बाप्पाच्या सोंडेवरुन हात फिरवत आहे, बाप्पाच्या पाया पडत आहे आण मध्येच बाप्पाची पापी घेत आहे. या व्हिडीओतून बाप्पा आणि चिमुकल्या मुलांचं किती छान नातं असतं हे पाहायला मिळत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> गावाकडे आता फक्त आजी-आजोबाच राहतात का? ‘हा’ हृदयस्पर्शी VIDEO पाहून शहरात राहणाऱ्या मुलांचे डोळे पाणावतील
लहान बाळांच्या गोड आणि खट्याळ बोलण्याने तसेच त्यांच्या निरागसतेचे नेटकरीसुद्धा वेडे होतात. कदाचित याच कारणामुळे छोट्या बाळांचे मजेदार व्हिडीओ अपलोड केले जातात. सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. हे व्हिडीओ पाहून दिवसभराचा थकवा नाहीसा होतो आणि आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य येतं. एका चिमुकल्याने सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.