Amchya Papani Ganpati Anala:आमच्या पप्पांनी गणपती आणला हे गाणं सध्या सर्वत्र व्हायरल झालं आहे. चिमुकल्या साईराजने हे गाणं गाऊन साऱ्यांनाच भूरळ पाडली. सोशल मीडियावर साईराजचं गाणं व्हायरल झाल्यावर सर्वांनीच त्यावर रील व्हिडीओ बनवले आहेत. हा व्हायरल व्हिडिओ आहे साईराज केंद्रे या चार वर्षाच्या चिमुकल्याचा. परळीतल्या या मुलाचा निरागस पणा सगळ्यांना वेड लावतोय. मात्र दरम्यान अशाच आणखी एका चिमुकल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

चिमुकल्यांपासून ते मोठ्यांपर्यंत बाप्पासाठी वेड आहेत. अशातच सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर ही चिमुकली कुटुंबासोबत लाडक्या बाप्पाला घ्यायला पोहोचली. तिच्या निरागसपणा आणि बोबडे बोलीतील प्रश्न ऐकून आपण भारावून जातो. गणपती बाप्पा मोरया म्हणत तुडूतुडू ती नाचत आहे. तिचे वडील विचारतात की, तुला आवडतात ना मोदक, मग खाणार मोदक…त्यावर हो गोंडस मुलगी इतक्या छान प्रकारे हावभाव करत सांगते की आपण तिच्या प्रेमातच पडतो. त्यावर ही चिमुकली हातवारे करत विचारते बाप्पा मोदक कसा खातो असा खातो का?

Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Childrens day 2024 | childhood days never come back
Children’s day 2024 : बालपणीचे दिवस परत कधीही येत नाही! VIDEO पाहून आठवेल तुम्हाला तुमचे बालपण
group of women amazing dance on famous song Dilat Zapuk Zupuk vajta rahtay
“दिलात झापुक झूपूक वाजत राहतय ग” महिलांनी केला जबरदस्त डान्स, VIDEO एकदा पाहाच
Little Boy Viral Video
“तू मोठा झाल्यावर किती बायका करणार?” चिमुकल्यानं दिलं भन्नाट उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल; VIDEO एकदा पाहाच
Puneet Superstar eating bread with mud shocking video goes viral
फक्त आणि फक्त व्ह्यूजसाठी हद्द पार केली! बिग बॉसच्या एक्स कंटेस्टंटनं चिखलात ब्रेड बुडवून खाल्ला; VIDEO पाहून झोप उडेल
Mother Saved Her Daughters Life Who Had Drowned In The Sea Thrilling Video Went Viral
एक लाट अन् माय-लेकींचा थेट मृत्यूशी सामना; नेमकं काय घडलं? Shocking Video पाहून अंगाचा थरकाप उडेल

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: बापरे! २ कोटींच्या नोटा आणि ५० लाखांची नाणी, बाप्पासाठी बंगळुरुत केली अनोखी सजावट

लहान बाळांच्या गोड आणि खट्याळ बोलण्याने तसेच त्यांच्या निरागसतेचे नेटकरीसुद्धा वेडे होतात. कदाचित याच कारणामुळे छोट्या बाळांचे मजेदार व्हिडीओ अपलोड केले जातात. सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. हे व्हिडीओ पाहून दिवसभराचा थकवा नाहीसा होतो आणि आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य येतं. एका चिमुकल्याने सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.