आपल्या रोजच्या वापरातल्या काही गोष्टी असतात ज्या आपल्यासाठी फार नॉर्मल असतात मात्र याच गोष्टी ज्यांच्याकडे नसतात, त्यांना या गोष्टींबद्दल जास्त कुतुहल असतं. आपल्याकडे सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टी बाहेरगावी मात्र सहसा मिळत नाही,किंवा त्यासाठी त्यांना मोठी किंमत मोजावी लागते. अमेरिकेत सर्वच वस्तूंची किंमत ही भारताच्या तुलनेत जास्तच असते. आता हेच बघा ना, आपल्या प्रत्येकाच्या घरात खाट असते. आता शहरात त्याची जागा बेडने घेतली असली तरी, गावाकडे मात्र अजूनही घरांमध्ये खाट असते. हल्ली शहरात ढाब्यावर, हॉटेलमध्येही अशा खाट ग्राहकांसाठी ठेवलेल्या असतात. या खाटेची किंमत भारतात फार फार तर २ ते ४ हजारांपर्यंत असेल, मात्र अमेरिकेत याच भारतीय बनावटीच्या खाटेची किंमत तुमच्या पाच महिन्यांच्या पगारापेक्षा जास्त आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देसी खाटेची किंमत एकून व्हाल थक्क

अमेरिकेत भारतीय बनावटीच्या एका खाटेची किंमत तुमच्या पाच महिन्यांच्या पगारापेक्षा जास्त आहे. जर तुमचा पगार महिन्याला वीस हजार रुपये असेल तर समजून जा की पूर्ण पाच महिन्यांचा पगार देऊनही तुम्हाला अमेरिकेत खाट विकत घेता येणार नाही. कारण ई-कॉमर्स वेबसाइटवर विकल्या जात असलेल्या खाटांची किंमत एक लाखांहून अधिक असल्याचं दिसत आहे. याबाबत सोशल मीडियावरही चर्चा रंगली आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. भारतीत अतिशय शुल्लक वाटणाऱ्या वस्तूची किंमत बाहेरच्या देशात मात्र न परवडणारी आहे.

पाहा किंमत

हेही वाचा – Accident Viral Video: भरधाव ट्रकखाली आला तरुण, अंगावर काटा आणणारा अपघात सीसीटिव्हीत कैद

वेबसाईट पाहिल्यावर अमेरिकेत खाटेची मागणी वाढल्याचे दिसते. कारण इथे फक्त चार खाटा उरल्या आहेत असे ई-कॉमर्स वेबसाइटने नमूद केले आहे. याप्रमाणेच अशा अनेक वस्तू आहेत, ज्याच्या किंमती या भारताच्या तुलनेत अमेरिकेत चौपट आहेत.  यासोबतच काही सोशल मीडिया यूजर्स अमेरिकन लोकांना सल्ला देत आहेत की त्यांनी भारतात येऊन खरेदी करावी.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: America e commerce website selling desi khaat over 1 lakh rupees srk
Show comments