अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात ‘अमेरिका फर्स्ट’ ही घोषणा केली होती. त्यानंतर सोशल मीडियामध्ये अमेरिका फर्स्ट या ट्रम्प यांच्या घोषणेची खिल्ली उडवणारा पॅरोडी व्हिडिओ व्हायरल झाला आहे. प्रत्येक क्षेत्रात अमेरिका फर्स्ट म्हणजेच नंबर वन असल्याचा दावा ट्रम्प करत असले तरी भारत हे दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे या व्हिडिओत विविध दाखले देऊन नमूद करण्यात आले आहे. सोशल मीडियात या व्हिडिओवर लोक तुटून पडले आहे. ट्रम्प यांच्या आवाजात हा व्हिडिओ असला तरी भारतीय कसे सरस आहेत, हे यामध्ये दाखवण्यात आले आहे. भारतीयांकडून व्हॅलेंटाइन निमित्त अमेरिकेला हा संदेश असल्याचे व्हिडिओच्या सुरूवातीलाच सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे इंडिया सेकंडप्रमाणोच इतर देशांनीही अमेरिका फर्स्टला त्यांच्या त्यांच्या शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. स्वीत्झर्लंड, पोर्तुगीज, इटली आदी देशांमध्येही असे व्हिडिओ बनवण्यात आले आहेत.
अमेरिका फर्स्ट असले तरी अमेरिकेत भारतीय हे अव्वल आहेत. अमेरिकेतील प्रत्येक क्षेत्रात भारतीय दिसतात. टॅक्सी चालक असो की सॉफ्टवेअर क्षेत्रातही भारतीय आहेत. गुगल, मायक्रोसॉफ्टचे प्रमुखही भारतीय असल्याचे अत्यंत हलक्या फुलक्या शैलीत व उपरोधिकपणे या व्हिडिओत दाखण्यात आले आहे. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली, आयबीएम कंपनीत भारतीय आहेत. भारताने कामसूत्र, योग हेही भारताची देण आहे. इतकंच काय शून्याचा शोध ही भारताने लावला असे व्हिडिओत सांगितले आहे. भारत लोकसंख्येतही नंबर दोनवर आहे. प्रदूषणातही दुसरा नंबर आहे. ताजमहलचेही यात कौतुक करण्यात आले आहे. त्याचवेळी शेजारचा देश असलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची या व्हिडिओत खिल्ली उडवण्यात आली आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा