America Shocking Video : जगभरातील लोक अमेरिका हे उच्च प्रतिष्ठित जीवन जगण्यासाठी एक उत्तम देश असल्याचे मानतात. कारण- हा देश आर्थिकदृष्या प्रगत देश आहे. त्यामुळे तिथल्या लोकांचे राहणीमान आणि शिक्षण हेदेखील तितकेच उच्च प्रतिष्ठित आहे. आतापर्यंत तुम्ही अमेरिकेतील एक चांगली बाजू पाहिली. तिथल्या अनेक गोष्टींचे कौतुक केले; पण बेंगळुरूचा यूट्यूबर ईशान शर्माने अमेरिकेतील दुसरी बाजू दाखवली आहे; जी इतकी विदारक आणि भयानक आहे की, ती पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या यूट्यूबरने सोशल मीडियावर अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमधील एक धक्कादायक व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यातील दृश्य पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही की खरंच असे अमेरिकेत घडतेय.

या व्हिडीओमध्ये मद्यधुंद, मानसिकदृष्ट्या अस्थिर व बेघर लोक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. अनेक जण मद्यधुंद अवस्थेत आहेत. अनेक तरुण-तरुणी अमली पदार्थांच्या व्यसनामुळे रस्त्यावर भटकतायत.

Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
In Devendra Fadnavis meeting Mukesh Shahane absconding from the police on the platform
देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत पोलिसांच्या लेखी फरार मुकेश शहाणे व्यासपीठावर
Crime NEws
Crime News : घरात चिकन बनवण्याचा आग्रह, आई आणि भावांनी गळाच आवळला; पोलिसांना कसा लागला खुनाचा छडा?
The young woman hit under the donkey's ear
पाठलाग करणाऱ्या गाढवाबरोबर तरुणीनं केलं असं काही… VIDEO पाहून नेटकरीही झाले अवाक्
The unique friendship of a leopard and a deer
“अशी मैत्री कधी पाहिली नसेल…” बिबट्या आणि हरणाची अनोखी मैत्री; VIDEO पाहून व्हाल थक्क
car accident video | car hits woman distracted by phone
थरारक अपघात! भरधाव कारच्या धडकेत तरुणी हवेत उडून रस्त्यावर आदळली अन् नंतर केलं असं काही की…; VIDEO पाहून बसेल धक्का

यूट्यूबर ईशानने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, ‘हे मन हेलावणारे दृश्य आहे. एकेकाळी टेक्नॉलॉजीत अग्रेसर असलेले सॅन फ्रान्सिस्को शहर आता सर्वांत असुरक्षित ठिकाण बनले आहे. इथले अर्धे रस्ते, पदपथ बेघर, नशेबाज आणि मानसिकदृष्ट्या आजारी लोकांनी भरलेले आहेत. हे टेक कॅपिटलिजमच्या अपयशाचे दृश्य आहे.

जगासाठी आकर्षण असणाऱ्या देशातील विदारक सत्य

सॅन फ्रान्सिस्को हे अमेरिकेतील सर्वांत श्रीमंत शहरांपैकी एक आहे. Facebook, Google, Levi Strauss, Salesforce, Reddit सारख्या मोठ्या टेक कंपन्यांचे मुख्यालय येथे आहे. हे असे शहर आहे की, जिथे तंत्रज्ञानाच्या नावीन्याने जग बदलण्याचे काम केले. पण, ईशानने शेअर केलेल्या या व्हिडीओने या झगमगत्या आणि प्रगत शहरामागे दडलेले एक कटू सत्य समोर आले आहे.

PHOTO : तरुणाने बनवला कामवाल्या बाईचा असा CV की, पाहताच लोकांनी दिल्या कामाच्या अनेक ऑफर्स

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

ईशानच्या या पोस्टवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने लिहिले, “सॅन फ्रान्सिस्कोची स्थिती भांडवलशाही आणि व्यवस्थेचे अपयश दर्शवते. हे सुधारण्यासाठी धोरणे आणि समुदाय गुंतवणूक आवश्यक आहे.” दुसऱ्या युजरने लिहिले, “हे चकचकीत जीवनाचे खरे वास्तव आहे, जिथे तंत्रज्ञान पुढे आहे; पण माणसं मागेच राहत आहेत.”