Fighter Jet Viral Video: एफ-१६ (F-16) लढाऊ विमान जगातील सर्वात चांगल्या फायटर जेट विमानांपैकी एक आहे. या विमानात सिंगल सीट असते. एफ-१६ या लढाऊ विमानाची निर्मिती अमेरिकेत करण्यात आलीय. तसेच हा विमान अमेरिकेसह अनेक देशांकडे आहे. हा विमान प्रत्येक ऋतुमध्ये आकाशात उडू शकतो आणि दुश्मनांच्या ठिकाणांना उद्ध्वस्त करु शकतो. F-16 लढाऊ विमान आकाशात ४० हजारांहून अधिक उंचीवर उडू शकतात. पण फायटर प्लेन उडवताना एखाद्या वैमानिकाला टॉयलेटला आल्यावर तो काय करतो? लढाऊ विमानांमध्ये टॉयलेट बनवलेला असतो? जर नसेल तर वैमानिक टॉयटेला कसं जात असेल?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विमान उडवताना वैमानिकाला जेव्हा टॉयलेटला येते, तेव्हा….

अॅडवान्स लढाऊ विमानात वैमानिकासाठी खास व्यवस्था असते. अमेरिकेच्या हवाई दलातील वैमानिक हसार्ड ली ने सांगितलं की, उड्डाणाच्या वेळी लढाऊ विमानात वैमानिका टॉयलेटला आल्यावर काय करतो? त्यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

नक्की वाचा – Viral Video: पठ्ठ्या चक्क स्कुटीलाच हवेत उडवायला गेला अन् दणकण जमिनीवर आपटला, नेटकरी म्हणाले, “अजून हिरोगीरी कर”

इथे पाहा व्हिडीओ

‘ही’ गोष्ट वैमानिकाला उपयोगी ठरते

वैमानिक हसार्ड ली ने सांगितलं की, लढाऊ विमानाच्या उड्डाणावेळी वैमानिकाकडे अनेक पिडल पॅक असतात. या पॅकमध्ये सुकवणारे म्हणजेच अब्सार्वेंट बीड्स असतात. हे डिटर्जेंट पावडरसारखे असतात. वैमानिक याच पॅकच्या आतमध्ये टॉयलेट करतात. लघवी याच्या संपर्कात आल्यावर तो जेलसारखा बनतो आणि पसरन नाही. टॉयलेट केल्यानंतर वैमानिक या पॅकला विमानात बनवलेल्या कंपार्टमेंटमध्ये ठेवतात.

वैमानिकाला या गोष्टीची घ्यावी लागते काळजी

अमेरिकेच्या हवाई दलाचे वैमानिक हसार्ड ली ने म्हटलं की, जेव्हा अफगानिस्तान मध्ये तैनात होतो, त्यावेळी मी आठ तासांपर्यंतही फायटर जेट उडवायचो. उड्डाणावेळी विमानातच करावं लागत होतं. टॉयटेल करताना विमान सरळ उडतंय की नाही, याचीही काळजी घ्यावी लागेत.