Kसमलिंगी ही नैसर्गिक अवस्था म्हणता येऊ शकते. काही जणांना समलिंगी व्यक्तीचं आकर्षण वाटू शकतं. ते शरीरसुखाच्या संदर्भात असतंच असं नाही; पण आपल्यासारख्याच दिसणार्या, आपल्याच वयाच्या किंवा आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीचं आकर्षण होणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. समलिंगी असणं नैसर्गिक आहे. प्रत्येक व्यक्तीचे लैंगिक अग्रक्रम असतात. सर्वसामान्यपणे स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटतं. म्हणजेच तो त्यांचा लैंगिक अग्रक्रम असतो. त्याचप्रमाणे ज्यावेळी पुरुषाला पुरुषाबद्दल आणि स्त्रीला स्त्रीबद्दल आकर्षण वाटतं, सहवास आणि पुढे जाऊन सहजीवन व्यतित करावंसं वाटतं. अशीच एक समलैगिक जोडप्याची लव्हस्टोरी व्हायरल होत असून सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरत आहे.
@Sarowarrrr या नावाच्या छायाचित्रकाराने आपल्या आपल्या हँडलवरून ‘अ न्यूयॉर्क लव्ह स्टोरी’ या कॅप्शनखाली काही फोटोज शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दिसणारी एक मुलगी अंजली चक्रा ही भारतीय वंशाची आहे. तर दुसरी सुंदास मलिक ही पाकिस्तानी वंशाची आहे. या दोघीही गेले वर्षभर रिलेशनशिपमध्ये असल्याची माहितीही समोर आली आहे. त्यांनी काही फोटोस शेअर करून आपल्या रिलेशनशिपबद्दल सांगितलं आहे.
दरम्यान, प्रेमाला कोणत्याही जात, धर्माचं बंधन नसतं हे त्यांच्या फोटोवरून दिसून येतं. सुंदास मलिक एक आर्टिस्ट आहे. त्यांच्या रिलेशनशिपला एक वर्ष झाल्यानंतर त्यांनी आपले काही फोटोस इन्स्टाग्रामवर शेअर केले. तसेच आपल्या रिलेशनशिपला एक वर्ष झाल्याचं त्यांनी सेलिब्रेशनही केलं होतं. सध्या त्यांनी शेअर केलेले फोटोस हे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत आहेत.