अमेरिकेतील वेरा कॉनर नावाच्या एका महिलेने सबवे सॅन्डविचचे बिल भरत असताना प्रचंड मोठा गोंधळ घातल्याचे समोर आले आहे. तिने बिलातील देय रकमेऐवजी, चुकून आपल्या फोन नंबरचे शेवटचे सहा आकडे टाकून बँक ऑफ अमेरिकाच्या कार्डचा वापर करून हे बिल भरले. वेराने ऑक्टोबर २०२३ रोजी सबवेमधील ‘इटालियन फूट लॉन्ग सब सॅन्डविच’ची ऑर्डर दिली असून त्याची किंमत ७.५४ डॉलर्स म्हणजेच, साधारण ६२८ रुपये इतकी होती. असे ‘NBC न्यूज’ला सांगताना सांगितले. परंतु, तिच्या एका चुकीमुळे ६२८ रुपयांऐवजी तब्बल ५,९१,९५१ रुपायांचा [७,१०५.४४ डॉलर्स] फटका तिला बसला आहे.

वेरा कॉनरने ‘बँक ऑफ अमेरिका’ या बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करून हे बिल भरले आहे. फोनचे शेवटचे सहा आकडे टाकत असताना तिला असे वाटले की, ती सबवेचे लॉयलटी पॉईंट्स मिळवत आहे. परंतु, कोणत्यातरी कारणाने स्क्रीनवर बदल झाला असेल आणि त्या सर्वांचे एका टीपच्या स्वरूपात रूपांतर झाले असावे, असे वेराचे म्हणणे आहे.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Marathi writer actress Madhugandha Kulkarni post viral
“ना पैसे होते, ना धंद्याची अक्कल…”, लेखिका, अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णीच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली…
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
rupee falls 4 paise to close at all time low of 84 43 against us dollar
रुपया ८४.४३ च्या गाळात!
IRCTC Refund Policy check how much refund will be given on canelled tickets of trains
IRCTC Refund Policy: ट्रेनची तिकीट रद्द केल्यावर किती ‘रिफंड’ मिळतो? जाणून घ्या सविस्तर
Shocking video Year Old Boy Slaps Mother Repeatedly After Finding Her Over Drug Use
पोटच्या मुलानं आईला भररस्त्यात बेदम मारलं; कारण ऐकून नेटकरी म्हणाले बरोबर केलं; VIDEO पाहून सांगा तुम्हाला काय वाटतं
eight lakh rupees forgotten in a rickshaw returned to a female passenger In Kalyan
कल्याणमध्ये रिक्षेत विसरलेला आठ लाखाचा ऐवज महिला प्रवाशाला परत

हेही वाचा : Viral Video : धाडसी तरुणाने चक्क किंग कोब्राला केले किस; पाहा हा व्हिडीओ….

आठवड्याच्या शेवटी जेव्हा वेराने तिचे बँक आणि क्रेडिट कार्ड स्टेटमेंट तपासून पहिले तेव्हा झालेला हा एवढा मोठा घोळ तिच्या लक्षात आला. “अरे देवा! हे असं कसं झालं? असा प्रश्न मला पडला. जेव्हा मी माझा रिसीटवरील तो आकडा पहिला, तेव्हा मला तो काहीसा ओळखीचा वाटला. नंतर लक्षात आलं की, हे आपल्याच फोन नंबरमधील शेवटचे सहा आकडे आहेत. कोणत्याही ठिकाणी कोणतीही व्यक्ती इतकी मोठी टीप देईल का? तुम्हीच सांगा”, असे वेरा कॉनर यांनी, ‘NCB न्यूज’सोबत बोलताना सांगितले.

हा सर्व गोंधळ लक्षात आल्यानंतर तिने ताबडतोब बँक ऑफ अमेरिकेकडे धाव घेतली आणि सर्व घटना सांगून पैसे परत मिळवण्यासाठी अर्ज केला. मात्र, सुरुवातीला हा अर्ज बँकेकडून नाकारण्यात आला.

“मला वाटले होते की, हा सर्व प्रकार सहज निस्तरता येऊ शकतो. परंतु, जेव्हा बँकेनी तो अर्ज फेटाळला, ते देखील कोणतेही कारण न देता, तेव्हा मात्र मला भीती वाटू लागली होती.”

हे सर्व प्रकरण भरभर मार्गी लागण्यासाठी, वेराने त्या सबवेमध्ये जाऊन तेथील मॅनेजरचीदेखील मदत मागितली; परंतु ‘या प्रकरणात बँकेने तुमची मदत केली असती’ असे सांगितले. “तुम्ही कायम ऐकत असता, की खरेदीसाठी डेबिट ऐवजी क्रेडिट कार्डचा वापर करा, म्हणजे तुम्हाला अशा गोष्टींचा त्रास होणार नाही. पण, आता मला बँकेवरच राग आला असून, इतकी मोठी रक्कम कुणी सबवेसारख्या ठिकाणी का खर्च करेल? अशी साधी शंका त्यांना कशी आली नाही, याबद्दल आश्चर्य वाटत आहे”, असेदेखील वेराने NCB न्यूजसोबत बोलताना सांगितले.

यानंतरदेखील वेरा कॉनरने पुन्हा एकदा रिफंडसाठी अर्ज केला होता. यावेळेस मात्र महिन्याभरानंतर वेराला तिचा रिफंड मिळाला.

“आम्ही, वेरा कॉनर नावाच्या महिलेचे पैसे परत करण्यासाठी, तिचा रिफंड तिला देण्यासाठी सबवेला विनंती केली होती. त्यामुळे त्यांनीदेखील सर्व प्रकरण समजून घेऊन, त्या महिलेला तिचा रिफंड देऊन टाकला”, असे बँक ऑफ अमेरिकेतील प्रवक्त्याने, ‘न्यूयॉर्क पोस्ट’ला माहिती देताना सांगितले.