जागतिक विक्रम म्हणून नोंदवल्या गेलेल्या या सँडविचमध्ये तुम्हाला हवे तितके प्रकार उपलब्ध असले तरीही वरून कुरकुरीत आणि यातून मऊ लागणाऱ्या ग्रिल चीज सँडविचची बात काही औरच आहे. बनवायला अतिशय सोपा आणि कधीही खाता येणारा हा पदार्थ जवळपास सर्वांच्याच आवडीचा आहे. अमेरिकेच्या दोन ब्लॉगर्सनी या सँडविचसोबत काहीतरी भन्नाट करायचा विचार केला आणि चक्क जगातील सर्वांत मोठे ग्रिल चीज सँडविच बनवून विक्रम रचला.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या अहवालानुसार, एक्सोडस व इग्गी चौधरी [Exodus and Iggy Chaudhry] या दोन यूट्युबर्सनी त्यांचे एक लाख [१०० K] सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्याच्या आनंदात त्यांनी हा रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला असल्याचे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या यूट्युबर्सना हा विक्रम रचण्यासाठी, दोघांचे कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनीही मदत केली असल्याचे समजते. सर्वांच्या मदतीने एक्सोडस व इग्गी यांनी मिळून ६.२ फूट रुंद, ३.३२ फूट लांब व २.७ इंच जाडी असलेले ग्रिल चीज सँडविच बनवले आहे. या सँडविचसाठी त्यांनी फोकाकीय [Focaccia] नावाचा एक पातळ ब्रेड वापरला आहे.

हेही वाचा : Video : प्रेयसीला चक्क पोलिसांसमोर घातली लग्नाची मागणी!! तरुणाचे हे ‘फिल्मी’ प्रपोजल होत आहे Viral; व्हिडीओ पाहा


“या ब्रेडच्या स्लाइसचा वापर केल्याने त्यांच्या सँडविचचा आकार जसाच्या तास राहिला आहे.” असे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचे म्हणणे आहे. त्यासोबतच सँडविचमधील ब्रेडचा खालचा भाग हा खास तयार केलेल्या चुलीच्या आगीवर भाजला गेला असून, ब्रेडचा वरचा भाग हा ब्लो टॉर्चच्या मदतीने भाजण्यात आला आहे. “दोन्हीही गोष्टी करण्यासाठी फारच अवघड आहेत. कारण- दोन्ही बाजूंचे ब्रेड हे अतिशय व्यवस्थित भाजले जाऊन त्यामधील चीज वितळणे महत्त्वाचे होते,” असेही बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचे म्हणणे आहे.

या सँडविचचे वजन तब्बल १८९.९ किलो इतके आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या अधिकृत साईटवरील माहितीनुसार याआधी व्हरमॉंटच्या केबोट क्रीमरी [Cabot Creamery of Vermont] यांनी २००० साली असाच एक विक्रम रचला होता. परंतु, त्यांच्या विक्रमापेक्षा एक्सोडस व इग्गी या यूट्युबर्सनी केलेल्या विक्रमातील सँडविच हे ३५ टक्के मोठे आहे, असे समजते.

जगातील सर्वांत मोठे सँडविच तर पाहिले; परंतु सर्वांत झटपट सँडविच बनवण्याचाही विक्रम जर्मनीतील एका जोडप्याने केला आहे. त्यासाठी दोघांपैकी एकाचे हात बांधलेले आणि एकाच्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती. तरीही त्यांनी केवळ ४० सेकंदांमध्ये सँडविच बनवून विक्रम केल्याचे समजते.

हा व्हिडीओ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने त्यांच्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला असून, या व्हिडीओला १.५ मिलियन इतके व्ह्युज मिळाले होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: American youtubers make guinness world record of biggest grilled cheese sandwich weight around 190 kg dha
Show comments