Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराज हे तीन शब्द ऐकले तरी प्रत्येक मराठी माणसाचा उर अभिमानाने भरून येतो. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी मूठभर मावळ्यांना सोबत घेऊन जुलमी राज्यकर्त्यांविरोधात लढून रयतेचे राज्य निर्माण केले. याच महाराष्ट्राच्या ‘रयतेच्या राजाची’ आज ३९४ वी जयंती राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सध्या अशाच एका व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओत अवघ्या ७ वर्षांची चिमुकली आपल्या गोड आवाजात छत्रपती शिवाजी महाराज अन् माँसाहेब जिजाऊंच्या पराक्रमाची आठवण करून देणारं एक ओवी गीत गात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकली एका गडाच्या पायथ्याशी बसून आपल्या गोड आवाजात ‘उन्हाळा अन् पावसाळा स्वराज्याचा गारवा, जिजाऊच्या जीवावर न्हाई कोणाची परवा, आम्ही जिजाऊंच्या मुली, जश्या तलवारीच्या आन्या’ हे सुंदर ओवी गीत गात आहे. शिवप्रेमी शर्विका म्हात्रे असं या चिमुकलीचे नाव आहे. यावेळी तिने तिच्या पद्धतीने अगदी तालात या ओवी गीतातील काही कडवी गायली. चिमुकलीचा हा व्हिडीओ महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील अंकाई-टंकाई किल्ल्यावरील आहे. गडावर आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज अन् माँसाहेब जिजाऊंना वंदन करण्यासाठी तिने हे ओवी गीत गायल्याचे सांगितले जाते.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 : शिवजयंतीच्या द्या प्रियजनांना हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर मेसेज

सध्या शिवप्रेमी शर्विकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लोक कमेंट्स करत आहेत. अनेक जण कमेंट् करत शर्विकाच्या गाण्याचे कौतुक करत आहेत.