जगातील सर्वात उंच युद्धभूमी सियाचीन( Siachen) असो, किंवा अरुणाचल प्रदेशातील धोकादायक डोंगराळ प्रदेश असो भारतीय वायुसेनेच्या महिला वैमानिक आपल्या सामर्थ्याने देशाची मान उंचावत आहेत. भारतीय हवाई दलात सध्या १३०० महिला अधिकारी ग्राउंड आणि एअर ड्युटी करत आहेत. सीमेवर सैनिकांना मदत करणाऱ्या या वीरांची कहाणी काय आहे ते जाणून घेऊया. 

सुखोई Su-30MKI फायटर जेटचे पहिले वेपन सिस्टम ऑपरेटर फ्लाइट लेफ्टनंट तेजस्वी यांनी सांगितले की, आमच्या सैन्यात एका पेक्षा एक हुशार महिला आहेत, ज्यांनी जुन्या समजुती मोडल्या आहेत आणि त्यांची स्वप्ने पूर्ण केली आहेत. मुलींना स्वप्न बघायला शिकवले आहे. देशासाठी काहीही करण्याची हिंमत आहे. लवकरच महिलाही फायटर जेटच्या ताफ्यात दिसणार आहेत. पुरुष आणि महिलांसाठी प्रशिक्षण समान आहे. आम्ही समान आहोत. मग ते आकाश असो की जमिनीवरचा आधार. सर्वप्रथम आपण ‘एअर वॉरियर्स’ आहोत, बाकी सर्व काही यानंतर येते. 

( हे ही वाचा: Video: गावातील माणसाने ट्रकला बनवला चालता फिरता लग्नमंडप हॉल; आनंद महिंद्रा म्हणाले ‘मला भेटायचे आहे…’)

( हे ही वाचा: वनकर्मचाऱ्यांनी घडवून दिली हरवलेल्या हत्तीच्या पिल्लाची आईशी भेट; माता हत्तीने देखील दिला सोंडेने आशीर्वाद)

भारतीय हवाई दलाने सर्वाधिक तीन मुलींचा फायटर स्ट्रीममध्ये समावेश केला होता. अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि शिवांगी सिंग या तीन मुली आहेत. नंतर जेव्हा कांतने मिग-21 एकट्याने उडवून नाव कमावले तेव्हा शिवांगी सिंग राफेल फायटर जेटची पायलट बनली. फ्लाइट लेफ्टनंट अनी अवस्थी आणि ए नैन अरुणाचल प्रदेशातील चीन सीमेजवळील LAC च्या आजूबाजूच्या घनदाट जंगलात ALH ध्रुव हेलिकॉप्टर उडवत आहेत. ईस्टर्न कमांडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या महिला हवाई योद्धा आपल्यासाठी उत्तम काम करत आहेत. तसेच आपली विमाने खूप छान उडवतात. त्यांची काळजी घेतात.

लष्करातील महिलांचे सामर्थ्य पुढे नेण्याची सरकारची योजना आहे. अग्निवीर योजनेंतर्गत भरती करण्याचीही तयारी सुरू आहे. इंडिया टुडेशी बोलताना फ्लाइट लेफ्टनंट तेजश्वी म्हणाले की, भारतीय हवाई दलातील प्रत्येक वैमानिकाला काही ना काही ऑपरेशन करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. आम्ही पूर्व आणि ईशान्येकडील प्रदेशात फिरतो. आम्ही कोणत्याही प्रकारच्या आव्हानासाठी किंवा कार्यासाठी नेहमीच तयार असतो. तेजस्वी Su-30MKI फायटर जेटच्या मागील कॉकपिटमध्ये बसली आहे. तिथून ती त्याचे सेन्सर आणि शस्त्रे पॅनेल हाताळते. 

( हे ही वाचा: धगधगता ज्वालामुखी आणि त्यावरती दोरीवर चालणारी दोन मुलं…आयुष्यात इतकं भयानक दृश्य कधीही पाहिलं नसेल)

तेजस्वी सांगते की, ऑपरेशनच्या वेळी आपण जे काम करतो, तेच काम आपल्याला ट्रेनिंगमध्ये सतत शिकवले जाते. म्हणूनच ऑपरेशन किंवा मिशन नेहमी आपल्या मनात चालू असते. त्याच वेळी, सेकंड फ्लाइट लेफ्टनंट सख्या बाजपेयी म्हणाले की जेव्हा संयुक्त ऑपरेशन केले जाते. किंवा असे वॉरगेम्स आहेत, ज्यामध्ये उड्डाण करणे हे एखाद्या थरारापेक्षा कमी नाही. वास्तविक युद्धादरम्यान कसे वागावे हे आपण येथेच शिकतो. सतत प्रशिक्षण मोहिमांमध्ये सहभागी होऊन, प्रतिकूल परिस्थितीत आपण स्वतःला कसे टिकवून ठेवू शकतो हे यातून दिसून येते.

Story img Loader