पाकिस्तान म्हटलं की, एक टिपिकल इमेज आपल्या डोळ्यासमोर येते. डोक्यावर एका विशिष्ट प्रकारच्या पगड्या घालून गोळीबार करणारे, बाँब टाकणारे दहशतवादी आपल्या नजरेसमोर येतात. पाकिस्तानमधून येणाऱ्या दहशतवादाची झळ आपल्या सगळ्यांना पोचत असल्याने अशी प्रतिमा मनात निर्माण होणं साहजिक आहे.

पण या सगळ्यांना तोंड देत पाकिस्तानला दहशतवादाच्या विळख्यातून वाचवू पाहणाराही एक मोठा वर्ग पाकिस्तानमध्ये आहे. अनेक धडाडीचे पत्रकार यासंबंधी मोलाची कामगिरी बजावत आहेत.

पत्रकारांच्या या मोठ्या फौजेतले एक आहेत अमिन हफीझ. लाहोरमध्ये राहणारे अमीन हफीज यांची पत्रकारितेची शैली वेगळी आणि विनोदी वाटेल अशी आहे. एखाद्या गंभीर विषयावरच्या त्यांच्या स्टोरीज् जगभर थोड्या कमी प्रसिध्द आहेत. पण त्यांच्या रिपोर्टिंगच्या वेगळ्या शैलीमुळे त्यांचे अनेक व्हिडिओ रिपोर्ट्स नेटवर चर्चेचा विषय ठरले आहेत.पाहा त्यांनी कव्हर केलेली एक स्टोरी

तर हा प्रसंग होता तो ‘पाकिस्तान सुपर लीग’ या ‘तिथल्या आयपीएल’ च्या एका मॅचदरम्यानचा. या मॅचसाठी सामान्य प्रेक्षकांना तिकिटं मिळत नसल्याचं कळताच हाफिझसाहेब तिथे गेले आणि थेट लोकांमध्ये घुसत त्यांनी वृत्तांकन करायला सुरूवात केली. आपली स्टोरी कव्हर करत असताना जर नाचायची, आरोळ्या ठोकायची वेळ आली तर तेही अमीन हाफिझ करतात.

पण त्यांच्या या शैलीतही एक खासियत आहे ती म्हणजे या सगळ्या गोंधळात ते त्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीविषयी मध्येच कोपरखळी मारतात. तोपर्यंत त्यांच्याभोवतालचे लोक एकदम रिलॅक्स मूडमध्ये असतात, आणि हफीझसाहेबांना त्यांची स्टोरी अलगदपणे मिळते.

VIDEO: बाळाची झोपमोड टाळण्यासाठी आईची कसरत!

गेल्या काही वर्षांमध्ये चाँद मोहम्मदसारख्या पाकिस्तानी पत्रकाराचा रिपोर्टिंग करतानाचा विनोदी व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता तशीच अमीन हफीझचीही चर्चा होतेय. फरक इतकाच की अमीन हफीज त्यांची ही स्टाईल बातमी काढण्यासाठी जाणीवपूर्वक वापरतात.

पण त्यांच्या स्टोरीज् बघताना मजा येते राव!

Story img Loader